Saif Ali Khan Attacked: सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातल्या (Saif Ali Khan Attacked) आरोपीची पोलिसांना ओळख पटल्याचं समोर आलं आहे. या आरोपीला लवकरच अटक केली जाईल असं पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात कलम 109 अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय. त्यासह इतर कलमांअंतर्गतही विविध गुन्हे दाखल केलेत. आरोपी जिन्यावरून 12 मजले चढून वर आला आणि सैफ अली खानच्या घरात शिरला. सैफ अली खानच्या घरात तो चोरीच्याच उद्देशाने शिरल्याचं तपासात समोर येतंय, असं पोलीस उपायुक्त गेडाम यांनी स्पष्ट केलंय. हल्ल्याच्या विविध पैलूंचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 10 टीम कार्यरत आहेत अशी माहितीही उपायुक्त गेडाम यांनी दिली आहे. 


दोन महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी नेलं-


सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या दोन महिलांची पोलीस चौकशी करत आहे. यातील एका महिलेच्या हाताला जखम असल्याचे दिसतंय. या दोघींची पोलीस चौकशी करत आहेत. सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या  एरियामा फिलिप्स उर्फ लिमा याच्या तक्रारीच्या आधारावर वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर ट्रेस पासिग, चोरीसह जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






पोलीस अधिकारी काय म्हणाले?


वांद्रे पोलिस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या एका आरोपीची ओळख पटली आहे. आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात शिरला होता. आरोपीला लवकरच अटक केली जाईल. अटकेनंतर आम्ही तुम्हाला अधिक आणि सविस्तर माहिती देऊ, असं पोलिसांकडून सांगण्यात आले. 


सैफ अली खानच्या बाजूच्या इमारतीमधून अज्ञात व्यक्तीची एन्ट्री-


एका सूत्राने एबीपी माझा सांगितले की, सैफ अली खानच्या इमारतीशेजारी 'पेटफिना' नावाचा एक खूप जुना बंगला आहे आणि असा संशय आहे की संबंधित चोर सैफ अली खानच्या इमारतीच्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारून आत आला आहे. फॉरेन्सिक टीमने त्या भिंतीची आणि त्या जागेचीही तपासणी केली आहे. सूत्रांनुसार, ही भिंत 6-8 फूट उंच आहे आणि त्यावर चढणे इतके कठीण नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा तोच बंगला आहे जिथे दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम राहत होत्या, आता तिच्या कुटुंबातील इतर सदस्य तिथे राहतात. तबस्सुम यांचे 22 नोव्हेंबर 2022 रोजी निधन झाले.


सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्यावर पोलीस अधिकारी काय म्हणाले?, VIDEO:



संबंधित बातमी:


Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर; पोलिसांची त्या महिलेवर संशयाची सुई!