Saif Ali Khan Attacked Updates Marathi News : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाला(Saif Ali Khan Attacked) आज दोन दिवस उलटले असून अद्याप हल्लेखोर मोकाटच असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी मुंबई पोलिसांनी विविध पथके नेमून या प्रकरणाच्या तपासाची चक्र अधिक गतिमान केली आहे. अशातच पोलिसांनी विविध अँगलने केलेल्या या घटनेच्या तपासात एक मोठे यश मिळाल्याचे पुढे आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटली आहे. या संशयिताचा मुंबई पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. 


दुसरीकडे, मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर सैफ अली खान स्वत:च्या कारमधून न नेता चक्क रिक्षातून लीलावती (Lilawati) रुग्णालयात पोहचले होते. ज्या रिक्षावाल्याने सैफला आपल्या रिक्षातून (Auto Rikshaw) लीलावतीत पोहोचवलं, त्याने मध्यरात्रीचा तो थरारक प्रसंग ही 'एबीपी माझा' ला सांगितला आहे. अशातच रक्तबंबाळ झालेल्या सैफला ज्या भजनसिंग राणा या रिक्षावाल्यानं दवाखान्यात नेलं त्याना आता वांद्रे पोलीस स्थानकात आणण्यात आले आहे. भजनसिंग राणा यांच्या चौकशी आणि जबाब नोंदविण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात त्याना आणण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.


 एका संशयिताची ओळख पटली


 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्लामुळे गुरुवारचा दिवस बॉलिवूड इंडस्ट्रीसह देशातील साऱ्यासाठीच धक्कादायक ठरला. कारण रात्रीच्या सुमारास बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या टॉप अॅक्टर्सपैकी एक असलेल्या सैफ अली खानवर (Saif Ali Khan) घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला होता. एखाद्या दिग्गज सेलिब्रिटीच्या थेट घरात घुसून त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केल्यामुळे केवळ इंडस्ट्री नव्हे, तर देशभरात खळबळ माजली होती. मात्र या घटनेला आज दोन दिवस उलटले असूनही या प्रकरणातील हल्लेखोराला अटक करण्यात अद्याप यश आलेलं नाही. सध्या या फरार हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहे. तर दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार या हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटली आहे. या संशयिताचा मुंबई पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून पोलिसांकडून विविध अँगलने या घटनेचा तपास केला जात आहे. 


हल्लेखोराचे आणखी एक सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद  


दरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार सैफ अली खान यांच्यावरील हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्रे येथून दादरच्या कबुतर खाना परिसरात आल्याचे तपासात पुढे आले आहे. या ठिकाणी त्याने एका मोबाइल दुकानातून हेडफोन खरेदी केल्याचीही माहिती ही पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या नंतर सकाळी 9 च्या सुमारास  हे हेडफोन खरेदी केले आहेत. क्राइम ब्रांचच्या पोलिसांनी या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आता आपल्या ताब्यात घेतले आहे. त्या दिशेने पोलीस आता तपास करत आहे.


हे ही वाचा