Saif Ali Khan Attacked Updates: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attacked Updates Marathi News) होऊन दोन दिवस उलटले तरीही अजूनही हल्लेखोर मोकाट आहेत. 40 ते 50 जणांची चौकशी पण पोलिसांचे हात रिकामेच असल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचे विविध सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. 

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्र्यामधून दादरमधील कबूतर खाना परिसरात गेल्याची माहिती समोर आली आहे. इथल्या एका मोबाईल दुकानामध्ये आरोपीनं इअरफोन खरेदी केला. सैफ अली खानवर हल्ला करुन तेथून पळ काढल्यानंतर आरोपी 7 तासांनी दादारमधील मोबाईलच्या दुकानामध्ये दिसला. यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. आरोपीने दुकानामधून 50 रुपयांच्या इअरफोनची खरेदी देखील केली. 

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोबईलच्या दुकानात काय म्हणाला?

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोबईलच्या दुकानात गेला आणि म्हणाला, मला इअरफोन हवे आहेत. दुकानदाराने किती रुपयांचा इअरफोन हवे आहे, असं विचारले. त्यावर मला 50 रुपयांवाला इअरफोन हवाय असं उत्तर आरोपीने दिले. त्यानंतर आरोपीने 100 रुपयांची नोट दिली. त्यातील 50 रुपये परत केले, अशी माहिती संबंधित दादरमधील दुकानदाराने दिली. 

सैफ अली खान प्रकरणातील आरोपी दादर पश्चिमेला फलाट क्रमांक 1 वर उतरला अन्...

सैफ अली खान प्रकरणातील आरोपी वांद्रे स्थानकावरून दादरला गेला. दादर पश्चिमेला फलाट क्रमांक 1 वर उतरला. त्यानंतर सुविधा हा शोरूम समोरून तेथील जम्बो वडापार येथूनपुढे कबुतर खानाच्या दिशेने गेला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी काल रात्री आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वेकडूनही सीसीटिव्ही घेतलेले आहेत. रेल्वे पोलिसही या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत करत आहे.

रक्तबंबाळ सैफ अली खान एका वाघासारखा रूग्णालयात दाखल झाला-

रक्तबंबाळ सैफ अली खान एका वाघासारखा रूग्णालयात दाखल झाला होता. सोबत त्याचा लहान मुलगा तैमूरही होता. सैफ आता चालू लागलाय. त्याचा त्रास ब-यापैकी कमी झालाय. आयसीयूतून त्याला स्वतंत्र रूममध्ये शिफ्ट केलंय, अशी माहिती लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. 2-3 दिवसांत डिस्चार्जबद्दल विचार केला जाईल. आम्ही सैफला संपूर्ण बेडरेस्टचा सल्ला दिलाय, असंही डॉक्टरांनी सांगितले.

हल्ला केल्यानंतर आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती, VIDEO: 

संबंधित बातमी:

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर; पोलिसांची त्या महिलेवर संशयाची सुई!

Saif Ali Khan Attacked Updates: सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी महाराष्ट्रातील ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?