Sai Pallavi Birthday : सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री साई पल्लवीचा (Sai Pallavi) आज (9 मे) वाढदिवस आहे. आज ती तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. साई पल्लवीचा जन्म 9 मे 1992 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. अभिनेत्री साई पल्लवी तिच्या साध्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. तिने चित्रपटसृष्टीत फार कमी वेळातच एक वेगळी ओळख निर्माण केली असून, अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत हक्काचे स्थान मिळवले आहे. तिने आतापर्यंत दोन 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' जिंकले आहेत.
2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्तुरी मान' या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आत्तापर्यंत साई पल्लवीने केवळ मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, असे असूनही इतक्या कमी कालावधीत तिने मोठे स्थान मिळवले आहे.
अभिनेत्री व्हायचे नव्हते...
साई पल्लवीला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं होतं. तिच्याकडे वैद्यकीय पदवीही आहे. साई पल्लवीने तिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, जजिर्या येथे शिक्षण घेतले आहे. 2014 मध्ये, जेव्हा ती तिचे शिक्षण पूर्ण करत होती, याचदरम्यान तिला ‘प्रेमम’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला साऊथ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
जे नैसर्गिक तेच खरं सौंदर्य!
अभिनेत्री साई पल्लवी नेहमीच तिच्या क्यूटनेससाठी ओळखली जाते. सई पल्लवी ही एकमेव दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जी, नेहमी मेकअपच्या विरोधात असते. ती स्वत: देखील मेकअपशिवाय काम करते. यामुळेच तिने एकदा 2 कोटी रुपयांची ब्युटी प्रॉडक्ट जाहिरातीची ऑफरही नाकारली होती. एकदा साई पल्लवीला फेअरनेस क्रीमच्या दोन कोटींच्या जाहिरातीची ऑफर देण्यात आली होती. पण, तिने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास साफ नकार दिला होता. सईच्या मते, जे नैसर्गिक आहे तेच सौंदर्य आहे. तिला अशा कोणत्याही गोष्टीचा प्रचार करायचा नाही, ज्यामुळे लोकांमध्ये चुकीचा समाज पसरेल. साईच्या या निर्णयाचे त्यांचे खूप कौतुक झाले होते.
हेही वाचा :
- Akshyaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
- Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
- Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...