Sachin Pilgaonkar On Jaya Bachchan Amitabh Bachchan: मराठी सिनेसृष्टीचे महागुरू, सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदी (Hindi Movie) आणि मराठीत (Marathi Movie) अनेक सिनेमे केले. 'नदिया के पार', 'बालिका वधू', 'पारध', 'बचपन', 'ब्रह्मचारी', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकले. तर, 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं.
सचिन पिळगांवकर यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतही अनेक सिनेमे केले. 'सत्ते पे सत्ता'मधली दोन भावांची जोडी प्रेक्षकांना भावली. त्याव्यतिरिक्त 'त्रिशुल', 'शोले' या सिनेमांमध्येही अमिताभ बच्चन आणि सचिन पिळगांवकरांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. अशातच सचिन पिळगांवकरांनी नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यासोबत असलेल्या नात्याबाबत खुलासा केला आहे. तसेच, या मुलखातीत बोलताना अमिताभ बच्चन यांना मी भाई म्हणतो, असं सांगितलं. त्यासोबतच अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मी जयाजींच्या जास्त जवळ आहे, असंही ते म्हणाले.
मी जयाजींच्या जास्त जवळ: सचिन पिळगांवकर
मराठी फिल्म इंडस्ट्रीचे महागुरू सचिन पिळगावकर यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याशी असलेल्या ऑफ स्क्रिन नात्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, "आमचं नातं खूप चांगलं आहे. इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात. काही लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात. मी त्यांना भाई म्हणतो. आणि हे आमचं ते सगळं सुरू झालं ते 'सत्ते पे सत्ता' सिनेमापासून... त्याआधीही आम्ही एकत्र कामं केलेली आहेत. नाही असं नाही, आम्ही 'शोले'मध्ये होतो. त्यानंतर 'त्रिशूल'मध्ये पण होतो. पण, 'सत्ते पे सत्ते'मधला तो एक रॅपो वेगळा झाला. पण, मी जयाजींच्या जास्त जवळ आहे."
जयाजी माझे खूप लाड करतात, ते अमितजींना आवडत नाही : सचिन पिळगांवकर
"मी जयाजींसोबत एकही सिनेमात काम केलं नाही. माझ्याशी तर त्या खूपच गोड आहेत. Becaus I Am Her Blue Eyed Boy, त्या माझे खूप लाड करतात. आणि बहुतेक काही वेळेला ते अमितजींना आवडत नाही. कधी कधी ते म्हणतात, "ये जया के दहेज में आया है...". त्यांना कदाचित असं वाटत असेल की, "हिच्याजवळ का तो? माझ्या का नाही?", असं पण त्यांना कदाचित वाटत असेल. पण, Anyway तो रॅपो असतो ना एकमेकांचा. आम्ही एकत्र काम केलं, पण तेवढी जवळीक नाही. जेवढं काम न करता जयाजींसोबत आहे, तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय? तर त्या हिशोबानं पण आम्ही सगळे एकत्रच आहोत. आम्ही एकमेकांपासून दूर नाही"
दरम्यान, 80-90 च्या दशकात सचिन आणि सुप्रिया ही हिट जोडी, पुढे दोघांनी एकमेकांसोबत संसार थाटला. आज त्यांची मुलगी श्रिया पिळगांवकर इंडस्ट्री गाजवतेय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :