Ashti Crime News बीड: आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात सासरी होणार्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं असून घरासमोरच्याच विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथे ही घटना घडली असून सविता भाऊसाहेब विधाटे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात भाऊसाहेब विधाटे, सासरा किसन विधाटे आणि सासु लिलाबाई विधाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सध्या पोलीस करत आहे.
मुलांना दुध पिण्यासाठी माहेरहून गाय घेवून ये, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
पुढे आलेल्या माहितीनुसार, सविता आणि भाऊसाहेब यांचा विवाह 2008 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही काळ विधाटे यांनी सविताला चांगले नांदवले. परंतु मुलांना दुध पिण्यासाठी माहेरहून गाय घेवून ये म्हणत त्रास द्यायला सुरुवात केली. यानंतर स्कुटीसाठी पैसे मागितले. यानंतर काही दिवसांनी सविताच्या नणंदेला अहिल्यानगर येथे घर घ्यायचे असल्याने त्यासाठी पैशाची मागणी सविताच्या माहेरी केली जात होती. यावेळी मात्र वडील काशिनाथ फसले यांनी पैसे नसल्याने देऊ शकत नाही, असे सांगितले.
तर दुसरीकडे विधाटे कुटूंबीयांनी स्वतःचे अहिल्यानगर येथील घर विकण्याची तयारी सुरु केली होती. याला सविताने विरोध केला म्हणून पुन्हा त्रास सुरु झाला. शेवटी या त्रासाला कंटाळून सविताने घरासमोरील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. या प्रकरणात काशिनाथ फसले यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बीड जिल्ह्यात अकरावीच्या तब्बल 17 हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता
बीड जिल्ह्यात यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत तब्बल 17 हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखेच्या मिळून 51 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मात्र प्रवेशासाठी केवळ 34 हजार अर्ज आले आहेत.. आता किमान एक प्रवेश फेरी होईपर्यंत विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत.
दहावीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया करण्याचा निर्णय शासनाने घेतला.. 21 मे पासून ही प्रक्रिया सुरू केली गेली.. मात्र सुरुवातीपासूनच या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला 26 मे पर्यंत स्थगिती दिली गेली.. विद्यार्थ्यांना इतर बाबींच्या पूर्ततेसाठी 7 जून पर्यंत मुदत देण्यात आली.
जिल्ह्यातील 40,000 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात जागांची संख्या आधीच जास्त होती.. त्यात ऑनलाइन प्रक्रिया इतर जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेले प्राधान्यक्रम यामुळे विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या घटल्याचे दिसून आले..
इतर महत्वाच्या बातम्या