RRR : बाहुबलीच्यानंतर राजमौली यांच्याकडून आणखी एका चांगल्या चित्रपटाची प्रेक्षकांना अपेक्षा होती. त्यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटानं प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण केली आहे. अॅक्शन सिक्वेन्स हा या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. चित्रपटामधील अॅक्शन सिक्वेन्स हे जबदस्त आणि कल्पनेच्या पलिकडचे आहेत. असा अॅक्शन सिक्वेन्स आपण बाहुबली या चित्रपटामध्ये पाहिला होता. पण या चित्रपटातील अॅक्शन सिक्वेन्स बाहुबलीपेक्षा दमदार आहे. 


चित्रपटाचा दुसरा प्लस पॉइंट हा या चित्रपटातील कॅमेरा आणि व्हिज्युअल इफेक्ट्स हा आहे. या चित्रपटाचे कथानक स्वातंत्र्यापूर्वीच्या काळावर आधारित आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा काळ पडद्यावर उभा केला आहे. तसेच डिटेलपद्धतीनं या चित्रपटाचे कथानक मांडण्यात आलं आहे. 


रामचरण आणि ज्युनियर एनटीआरची जबरदस्त जोडी 
चित्रपटात  रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या जोडीनं कमाल केली आहे. त्यांचा अॅटीट्यूड आणि त्यांची स्टाईल लक्षवेधी आहे. त्या दोघांचे सिन चांगल्या पद्धतीनं मांडण्यात आले आहेत. तसेच आलिया भट आणि अजय देवगण यांनी आणि अजय देवगण या बॉलिवूड स्टार्सनं चित्रपटामध्ये काम केलं आहे, पण त्यांची भूमिका फार कमी आहे. कदाचित, बॉलिवूड चित्रपटांची आवड असणाऱ्यांसाठी त्यांना या चित्रपटामध्ये काम देण्यात आलं आहे, पण त्याचा फारसा फायदा झालेला नाही. 


चित्रपटाच्या कथानकाबाबत सांगायचं झालं तर देशाला स्वातंत्र मिळण्याआधी जो संघर्ष सुरू होता तेव्हा ब्रिटीशांद्वारा भारतीयांवर अनेक अत्याचार करण्यात आले. जंगलामध्ये राहणाऱ्या गोंड ट्राईबमधील एका मुलीला ब्रिटीश घेऊन जातात. तिला सोडवण्यासाठी भीम म्हणजेच एनटीआर आणि राम म्हणजे रामचरण हे ब्रिटीशांशी लढा देतात. या कथेवर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. 


सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणे अॅक्शन हाच या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. पण सारखे अॅक्शन सिन्स पाहून देखील तुम्हाला कंटाळा येतो आणि तरी देखील चित्रफट लवकर संपत नाही. जर तुम्ही एस. एस. राजामौली, एनटीआर आणि रामचरण यांचे फॅन असाल आणि तुम्हाला अॅक्शन सिन पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही पाहिला पाहिजे. या चित्रपटाला 3.5 स्टार्स मिळू शकतात. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha