Kareena Kapoor, Saif Ali Khan :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. करिना आणि सैफची मुलं जेह आणि तैमूर (Timur) हे फार कमी वयातच सेलिब्रिटी झाले आहेत. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूर हा पाच वर्षाचा आहे तर जेह हा एक वर्षाचा आहे.   बऱ्याच जेह आणि तैमूर यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत एक नॅनी दिसते. ही नॅनी तैमूर आणि जेहचा सांभाळ करण्यासाठी लाखो रूपये फी घेते. जाणून घेऊयात नॅनीबद्दल...


रिपोर्टनुसार तैमूर आणि जेह यांना सांभाळण्यासाठी ही नॅनी 1.5 लाख रुपये फी घेते. या नॅनीचं नाव सावित्री आहे. तैमूरचा जन्म 2016 साली झाल्यानंतर या नॅनीनं त्याला सांभाळायला सुरूवात केली. त्यानंतर जेहचा जनाम झाला. त्याला सांभाळायाची जबाबदारी देखील या नॅनीला देण्यात आली. 





करिना आणि सैफनं 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी  2021 रोजी जहांगिरचा जन्म झाला. 'जेह' हे जहांगिरचे टोपण नाव आहे.  करिना कपूरचा लाल सिंह चढ्ढा हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. करिनासोबत अभिनेता आमिर खान हा या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha