RJ Malishka Song on Pune Accident : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र बराच हादरलाय. पुण्यात दोन निष्पाप जीवांनी एका धनिकपुत्राच्या चुकीमुळे जीव गमावला. त्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. ती रात्र खरंतर पुणेकरांसाठी धक्कायदायक आणि विचार करायला भाग पाडणारी ठरली. कल्याणीनगर परिसरात एका पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली आणि यामध्ये दोन आयटी तरुणांचा अंत झाला. त्यावेळी ती गाडी एक अल्पवयीन धनिकपुत्र चालवत होता. याची शिक्षा म्हणून त्याला रोज 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितलं गेलं. त्यावर आणखी रोष निर्माण झाला. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत यावर तीव्र निषेध व्यक्त केला. त्यातच आता आरजे मलिष्का (RJ Malishka) हिने यावर एक तिखट गाणं तयार केलंय.
आरजे मलिष्का ही समाजातील अनेक घटानांवर भाष्य करणारं मार्मिक असं गाणं तयार करत असते. तिने मुंबई महानगरपालिकेवर केलेलं गाणं विशेष गाजलं. त्यानंतर अनेक घटनांवर मलिष्काने उपहासात्मक गाणी तयार केलीत. तिने सध्या पुण्यातील पोर्शे कार अपघातावरही गाणं तयार केलं आहे. तिचं हे गाणं सोशल मीडियावरही सध्या बरंच चर्चेत आलं आहे.
मलिष्काचं गाणं नेमकं काय?
मलिष्काने तिच्या या गाण्यात म्हटलं आहे की, जब मैं छोटा बच्चा था, बडी शरारत करता था. मेरी गाडी ठुक ही जाती, बचाने आता बाप.मी पुण्यामध्ये राहतो, माझ्या बापाचीच खातो, माझे वय आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा. पोर्शे बाहेर घेऊन गेले, दोन तरुण मेले, पिऊन होता गाडीत बसला, इसमे कोई नही मसला. ब्लेम ड्रायव्हर पे ठोकेंगे, मेरी लाईफ थोडी रोकेंगे. वकिल आहेत आहे पैसा, तो डर कैसा और किसका? जिसने parody बनाया इसपे एअआयआर लगाया, अरेस्ट झाले हॉटेलवाले, दोन डॉक्टर अरेस्ट झाले, सस्पेंड झाले पोलीसवाले, पण मी?... फक्त लिहिला निबंध, पिझ्झाचा झाला प्रबंध, आय एम स्टील नाबालीक ना... मैं तो बच्च हु ना... जिसने parody बनाया उपसे एफआयआर लगाया... कारण बापाचा पैसा... तु रोकेगा कैसे??? पोर्शे कोणाची...बापाची..रस्ता कोणाचा..बापाचा... वकिल कोणाचा... बापाचा... Law and Order कोणाचा बापाचा... आआआहा... पब्लिकचा... तुझ्या बापाचे पैसे... देख रोकेंगे कैसे... कभी पोर्शे कभी Pathole, कभी Politics... कोई और झोल... Public Memory is Very Short भैय्या... सबसे बडा रुपय्या... मगर इस मेमरी की ना डुबे नैय्या.. इसलिए मै हुं ना....
पुण्यात नेमकं काय घडलं?
हा धनिकपुत्र बारावी पास झाला म्हणून रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना वडिलांची आलिशान पॉर्शे कार घेऊन तो गेला.पार्टी संपवून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत त्याने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. यामध्ये दोन आयटी तरुणांचा जीव गेला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी या तरुणांची नावं आहे.