Ram Navami 2025: ज्या दिवसाची रामभक्त आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर आला आहे. आज रामनवमी.. आज रामजन्मानिमित्त देशासह जगभरात चैतन्याचं वातावरण आहे. भगवान रामाचा जन्मदिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, आज जर तुम्ही तुमच्या राशीनुसार काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यात धन, कीर्ती आणि वैभवाची कमतरता राहणार नाही.

भगवान रामाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतील..

पंचागानुसार, 6 एप्रिल हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि नवमी आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला. म्हणूनच रामनवमी नवव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान रामाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.ज्योतिषशास्त्रानुसार, राम नवमीला राशीनुसार काही उपाय केले तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात. यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते. राशीनुसार रामनवमीला कोणते उपाय करता येतील ते जाणून घेऊया.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, रामनवमीच्या दिवशी 'ओम श्री रामाय नम:' चा १०८ वेळा जप करा आणि भगवान श्रीकृष्णांना लाल चंदन अर्पण करा.

वृषभ 

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान रामाला गायीचे तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवा आणि पांढरे फुले अर्पण करा.

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीरामांना तुळशीच्या पानांसह गूळ आणि मूगाचे लाडू अर्पण करा.

कर्क 

ज्योतिषशास्त्रानुसार, रामचरितमानसातील सुंदरकांड पठण करा आणि पाण्यात केशर घाला आणि ते भगवानांना अर्पण करा.

सिंह 

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीरामांना गूळ आणि गहूपासून बनवलेल्या वस्तू अर्पण करा आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी अर्पण करा.

कन्या 

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान रामाला हिरव्या रंगाची फळे अर्पण करा आणि रामरक्षा स्तोत्राचा पाठ करा.

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांनी भगवान श्रीरामांना गुलाबाचे फूल आणि खीर अर्पण करावी. यासोबतच 'रमेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरण'. 'नरो न लिप्यते पापै भूतिम् मुक्तिम् च विंदति' या मंत्राचा जप करा.

वृश्चिक 

ज्योतिषशास्त्रानुसार, राम दरबाराची पूजा करा. यासोबतच, भगवानांना लाल फळे आणि मिठाई अर्पण करा.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार, रामनवमीच्या दिवशी पिवळे कपडे घालून पूजा करावी. यासोबतच, भगवान रामाला बेसनाचे लाडू आणि केळी अर्पण करा.

मकर

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीरामांची स्तुती करा आणि शनीच्या मंत्रांचा जप करा.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीरामांना निळे फुले अर्पण करा आणि 'श्री राम जय राम जय जय राम' या मंत्राचा जप करा.

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान रामाला केशर अर्पण करा.

हेही वाचा..

Lucky Zodiac Sign: प्रभू रामांचा दिवस आज, 'या' 5 राशींचं टेन्शन संपणार! तब्बल 5 योगांचा महासंयोग, हातात पैसा खेळेल, राजासारखं जगाल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)