घारे डोळे, मोकळ्या मनाची चंचल सौंदर्यवती, नाडियादवालाशी लग्न, यशस्वी कारकीर्द असताना दिव्या भारतीचा वयाच्या 19 व्या वर्षी झाला होता संशयास्पद मृत्यू
Divya Bharti : घारे डोळे, मोकळ्या मनाची चंचल सौंदर्यवती, नाडियाडवालाशी लग्न, यशस्वी कारकीर्द असताना दिव्या भारतीने वयाच्या 19 व्या वर्षी केला होता आयुष्याचा शेवट

divya bharti
1/6
Divya Bharti : अभिनेत्री दिव्या भारतीने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवलं होतं. 90 च्या दशकात आणि त्यापूर्वी देखील तिचे सिनेमे कायम हिट होताना दिसत होते. तिने तीन वर्षात बॅक टू बॅक 20 हिट सिनेमे करत नाव कमावलं होतं. घारे डोळे, मोकळ्या मनाची चंचल सौंदर्यवती अशी ओळख असलेल्या दिव्या भारतीने तरुणांच्या मनावर राज्य केलं होतं. दरम्यानच्या काळात तिने साजिद नाडियादवालासोबत लगीनगाठ देखील बांधली होती.
2/6
90 च्या दशकात दिव्याने आपल्या अभिनयाने आणि निरागस चेहऱ्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. तिच्या लहान वयामुळे तिला बॉलिवूडची गोंडस बाहुली देखील म्हटले जाते. 25 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या दिव्या भारतीचा 5 एप्रिल 1993 रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. दिव्याच्या मृत्यूला आज अनेक वर्षे लोटली आहेत.. मुंबई पोलिसांनी 1998 मध्येच मृत्यूच्या तपासाशी संबंधित प्रकरण बंद केले होते. हा अपघात असल्याचं नमूद करत पोलिसांनी प्रकरण बंद केले.
3/6
दिव्याला सिनेक्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. वडील ओमप्रकाश भारती एका विमा कंपनीत अधिकारी होते आणि आई मीता भारती गृहिणी होती. दिव्याने नववीपर्यंतच शिक्षण घेतले. वयाच्या 14 व्या वर्षी तिने अभ्यास सोडून मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
4/6
दिव्या तिच्या हिट चित्रपटाच्या जोरावर 1992 मध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती. शाहरुख खानने 1992 मध्ये 'दीवाना' चित्रपटातून दिव्यासोबत डेब्यू केला होता. त्यावेळी दिव्या फक्त 18 वर्षांची होती. हा चित्रपट प्रचंड गाजला. नंतर दिव्याने चित्रपट निर्माता साजिद नाडियादवालासोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.. साजिदसोबत लग्नानंतर दिव्या तणावाखाली असायची, असं बोललं जायचं. या तणावामुळे त्याने दारू पिण्यास सुरुवात केली. तिचा मृत्यू झाला त्या रात्रीही ती दारूच्या नशेत होती.
5/6
रिपोर्ट्सनुसार, 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या चेन्नईहून मुंबईतील वर्सोवा येथील तिच्या घरी परतली. फॅशन डिझायनर नीता लुल्ला पती डॉक्टर श्याम लुल्लासोबत दिव्याच्या घरी पोहोचल्या होत्या. तिघेही एकत्र दारू पीत होते. दिव्याची मोलकरीण अमृताही घरात होती. दिव्या बाहेर दिवाणखान्याच्या खिडकीवर पाय ठेवून बसली होती. त्यावर ग्रील नव्हते. ते पार्किंगच्या दिशेने उघडले. उठण्याचा प्रयत्न करत असताना तिचा हात निसटला आणि ती थेट पाचव्या मजल्यावरून खाली पडली.
6/6
नीता, श्याम आणि अमृता यांनी तिला कूपर हॉस्पिटलमध्ये नेले, पण दिव्याला वाचवता आले नाही. तिचा मृत्यू झाल होता. काहींनी याला आत्महत्या तर काहींनी षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. पण काहीही सिद्ध होऊ शकले नाही. दिव्याच्या मृत्यूनंतर 'रंग', 'शतरंज' आणि 'थोली मुद्दू' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात रंग सुपरहिट ठरला.
Published at : 05 Apr 2025 05:25 PM (IST)