Riteish Deshmukh on Manoj Jarange Patil : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची कितीही दिवस मुंबईत राहण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी भावना मराठा समाजाने बोलून दाखवली आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वरुन पोस्ट केली आहे. 

Continues below advertisement


रितेश देशमुख म्हणाला, सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा... श्री. मनोज जरांगे जी  हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽.  जय शिवराय, जय महाराष्ट्र (Riteish Deshmukh on Manoj Jarange Patil)


 






 


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (दि.30) दुसरा दिवस आहे. सुरुवातीला मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, नंतर एक दिवसाची परवानगी देण्यात आली. दरम्यान, काल पुन्हा एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या मागण्यांसदर्भात सरकार काय भूमिका काय घेत? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात अनेक ओबीसी नेते देखील बोलताना पाहायला मिळाले आहेत. ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंच्या मागण्यांना कडाडून विरोध केला आहे.  (Riteish Deshmukh on Manoj Jarange Patil)


इतर महत्त्वाच्या बातम्या


मल्याळम भाषेतील 'हृदयपूर्वम' सिनेमाने रजनीकांच्या 'कुली'ची हवा काढली, 'लोका चैप्टर 1' कडून तगडी फाईट, तीन दिवसांची कमाई एका क्लिकवर


झोपडपट्टीत आयुष्य घालवलेल्या मोनालिसाचं नशीब फळफळलं, बॉलिवूडनंतर आता साऊथमध्येही सिनेमा मिळाला