Sharmaji Namkeen : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. ऋषी कपूर यांचे चित्रपट अजूनही त्यांचे चाहते आवडीनं पाहतात. त्यांच्या शर्माजी नमकीन (Sharmaji Namkeen) या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ऋषी कपूर यांनी या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग पूर्ण केले होते. पण त्यांचे निधन झाल्यानंतर चित्रपटाच्या राहिलेल्या भागाचे शूटिंग परेश रावल (Paresh Rawal) यांनी पूर्ण केले.


निवृत्त झालेल्या एका व्यक्तीच्या आयुष्यावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. ट्रेलरमध्ये ऋषी कपूर हे कुकिंग करताना, डान्स करताना दिसत आहेत. ट्रेलरमधील त्यांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर,अरमान जैन,नीतू कपूर आणि आलिया भट यांनी हजेरी लावली होती. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर 31 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 



ऋषी कपूर, परेश रावल यांच्यासोबतच  जूही चावला, सोहेल नैय्यर,  तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha