Rishabh Shetty Kantara Success : 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला ऋषभ शेट्टीचा (Rishabh Shetty) कांतारा (Kantara) हा चित्रपट सध्या खूप गाजतोय. या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसण्यासोबतच ऋषभने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाची कथा दैवी नृत्यांगना आणि भूत कोला प्रथेवर आधारित आहे. या चित्रपटाची जादू प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसवर चालत असून, कर्नाटक सरकारही या चित्रपटाने प्रभावित झाल्याचे दिसत असून दैव नर्तकांसाठी मासिक भत्ता जाहीर करण्यात आला आहे.


दैवा नर्तकांना कर्नाटक सरकारने दरमहा 2,000 रूपये मासिक भत्ता जाहीर केला आहे. मात्र, या भत्त्याचा लाभ 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नर्तकांनाच मिळणार आहे. भाजप खासदार पीसी मोहन (P C Mohan) यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे.


पीसी मोहन यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की...






आपल्या ट्विटमध्ये पीसी मोहन यांनी लिहिले की, "भाजपच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दैवी नर्तकांसाठी 2,000 रुपये मासिक भत्ता जाहीर केला आहे." त्यांनी पुढे लिहिले की, "कांतारा चित्रपटात दाखवलेली भूत कोला परंपरा हिंदू धर्माचा भाग आहे."


दैव नर्तक म्हणजे ते लोक जे दैवाच्या पूजेच्या वेळी देवाच्या वेषात नृत्य करतात. अशा नर्तकांसाठी हा भत्ता असणार आहे. 


कांताराची आतापर्यंतची कमाई : 


ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' (Kantara) या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट रिलीज होऊन अवघे 20 दिवस झाले आहेत. पण, या चित्रपटाने कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल 171 कोटींहून अधिक कमाई केली असून, ही मालिका अजूनही पुढे सुरू आहे.


महत्वाच्या बातम्या : 


Kantara: बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’चं वादळ सुसाट! बिग बजेट चित्रपटांनाही टाकले पिछाडीवर