Kantara Become 2nd Biggest Kannada Film: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' हा चित्रपट रोज नवा इतिहास रचत आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. रिपोर्टनुसार 'कांतारा' चित्रपटाने 'KGF 1' ला मागे टाकून 'KGF Chapter 2' नंतर कन्नडमधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. दिवाळी वीकेंडमुळे चित्रपटाचे कलेक्शन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 170 कोटींवर पोहोचले आहे.
कांताराने केजीएफ पार्ट वनला मागे टाकले
पिंकविलाच्या वृत्तानुसार, 'कांतारा' चौथा आठवडा संपण्यापूर्वी 200 कोटींचा टप्पा पार करेल. 'कांतारा'ने कर्नाटकमध्ये आतापर्यंत सुमारे 111 कोटी रुपयांची कमाई केली आहे, त्यापैकी चौथ्या आठवड्यात 14 कोटी रुपयांची कमाई झाली आहे, जी 'KGF'च्या पूर्ण चौथ्या आठवड्याच्या दुप्पट आहे. यशच्या 'KGF 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाईचा विक्रम केला होता आणि कन्नडमध्ये कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आजही पहिल्या क्रमांकावर आहे.
हिंदीतही कांताराला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद
कन्नड भाषेतील लोकप्रियता आणि यश पाहून ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा चित्रपट 14 ऑक्टोबरला हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. तमिळ आणि तेलगूमध्ये 15 ऑक्टोबर रोजी आणि मल्याळम मध्ये कांतारा 20 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये आला. हिंदी भाषेतही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने हिंदीतही कोटींची उड्डाणं घेतली आहेत. आधी हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेले अफाट यश पाहून निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले.
'कांतारा' चित्रपट हा दंतकथा आणि ग्रामदेवतांवरील आदिवासींच्या विश्वासावरील कथा आहे. सिनेमाची कथा रीतिरिवाज आणि परंपरा आधारीत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेतसोबतच ऋषभने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाची कथा दैवी नर्तक आणि भूत कोला प्रथेवर आधारित आहे. या चित्रपटाची जादू प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसवर चालत आहे.
हे देखील नक्की वाचा- Kantara : 'कांतारा' चित्रपटाचे यश पाहून कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; दैव नर्तकांना मिळणार मासिक भत्ता