The Ghost Release On OTT: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन (Akkineni Nagarjuna) यांचा द घोस्ट (The Ghost) हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात नागार्जुन यांच्यासोबतच अभिनेत्री सोनल चौहाननं (Sonal Chauhan) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर नागार्जुन यांच्या या चित्रपटाला यश मिळालं नाही पण आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येऊन हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. 


या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट होणार प्रदर्शित


नेटफ्लिक्सच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे माहिती देण्यात आली आहे की, नागार्जुन आणि सोनल चौहान यांच्या द घोस्ट या चित्रपटाचं ऑनलाइन स्ट्रीमिंग 2 नोव्हेंबरपासून होणार आहे.  ज्यांनी अद्याप द घोस्ट पाहिला नाही, ते आता या नागार्जुन यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर घरबसल्या पाहू शकतात. 


साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा 'गॉड फादर' आणि नागार्जुन यांचा 'द घोस्ट' या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. पण या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही.


पाहा नेटफ्लिक्सची पोस्ट






बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर नागार्जुन यांच्या द घोस्टला ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे. प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix द्वारे अशी माहिती देण्यात आली आहे की या OTT अॅपवर द घोस्ट चित्रपट प्रदर्शित केला जाईल.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Happy Birthday Nagarjuna : बालकलाकर म्हणून केली करिअरची सुरुवात, आता साऊथचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो नागार्जुन!