Rinku Rajguru : सैराट सिनेमामुळे (Sairat) महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) ही घराघरांत पोहचली. त्यानंतर कागर, झिम्मा यांसारख्या सिनेमांमधून रिंकु प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता पुन्हा एकदा एका नव्या कलाकृतीच्या माध्यमातून रिंकु प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जिजाई हा रिंकुचा ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रिंकु महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची महिती सध्या समोर आलेली आहे. 


सोशल मीडियावर नुकताच या सिनेमाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर करण्यात आले. झी स्टुडिओज् या सिनेमाची निर्मिती करणार आहे. झी स्टुडिओनेच सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. यावर कॅप्शन देत म्हटलं की, शुभारंभ झाला, आता आपला आशीर्वाद असू द्या! रिंकु राजगुरु हिची प्रमुख भूमिका असलेला , नवा कोरा मराठी सिनेमा ‘जिजाई’.                          


'असा' मिळालेला रिंकूला 'सैराट'


'सैराट' हा चित्रपट रिंकू राजगुरूला खूप नाट्यमय पद्धतीने मिळाला आहे. नागराज मंजुळे काही कामासाठी अकलूजला गेले होते. त्यावेळी रिंकू राजगुरूला पाहिल्यानंतर त्यांनी तिला चित्रपटासाठी ऑफर दिली. रिंकूने पुढे 10 मिनिटांची ऑडिशन दिली. काही दिवसांतच  तिची या चित्रपटासाठी निवड झाली.                                  


'सैराट'नंतर रिंकूचा बोलबाला


'सैराट' या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने अनेक इमेज ब्रेक करणाऱ्या भूमिका निभावल्या. अल्पावधीतच तिला मराठीसह बॉलिवूडच्या अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलं. मिळालेल्या संधीचं रिंकूने सोनं केलं. आर्चीच्या भूमिकेनंतर रिंकूने विविध चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. कागर, मेकअप आणि अनपॉज्ड सारख्या चित्रपटांत ती झळकली. हँड्रेड डेज या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं. रिंकू राजगुरूचे सैराट, मनसू मल्लिंगे, कागर, मेकअप, 200 हल्ला हो, अनकहीं कहानियां, झुंड, अनपॉज्ड, झिम्मा-2 या चित्रपटांमध्ये रिंकूने काम केलं आहे. 






ही बातमी वाचा : 


Marathi Serial : 'नवीन करण्याच्या नादात काहीही करत सुटलेत...,' झी मराठीच्या नव्या 'इच्छाधारी नागीण'मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले