Richest South Indian Actress: सध्या बॉलिवूड (Bollwood News) अभिनेत्रींपेक्षाही (Actress) साऊथच्या अभिनेत्रींच्या (South Movie Actress) चर्चा रंगलेल्या असतात. साऊथच्या अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयानंही सर्वांना भूरळ घातली आहे. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, जिनं तिच्या अभिनयानं लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रीनं बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. गेल्या वर्षी तिनं अजय देवगणसोबत (Ajay Devgn) सुपर डुपर हिट चित्रपट (Superhit Movies) दिले आहेत. ही अभिनेत्री खूप आलिशान जीवन जगते आणि ती दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री (Richest Actress In South) देखील आहे. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) देखील संपत्तीच्या बाबतीत तिच्या मागे आहेत.
साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण?
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत, ती दुसरी तिसरी कोणी नसून सुपरस्टार अभिनेत्री ज्योतिका आहे. ज्योतिकानं दक्षिणेतील अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि खूप प्रसिद्धी मिळवली. तिनं 1998 मध्ये 'डोली सजाके रखना' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 26 वर्षांनंतर तिनं 'शैतान' या हॉरर सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली.
ज्योतिकाची एकूण संपत्ती किती?
कोइमोईच्या रिपोर्टनुसार, ज्योतिकाची एकूण संपत्ती सुमारे 331 कोटी रुपये आहे. तर, टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ज्योतिकाची एकूण संपत्ती 331 कोटी रुपये आहे आणि तिचा पती सूर्याची संपत्ती 206 कोटी आहे. दोघांची संपत्ती मिळून 530 कोटी रुपये आहे. त्यामुळे ज्योतिका आणि सूर्या टॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहे.
ज्योतिकानं मल्याळम, हिंदी आणि तमिळ सारख्या अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आणि न्यूज 18 च्या अहवालानुसार, ती प्रत्येक चित्रपटासाठी 5 कोटी रुपयांची फी घेते. अॅक्टिंग व्यतिरिक्त ज्योतिकाच्या उत्पन्नाचा स्रोत जाहिराती आणि रिअल इस्टेट, इतर बिझनेसमध्ये केलेली गुंतवणूक देखील आहे. ती अनेक प्रोडक्ट्स आणि ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर देखील राहिली आहे.
तिरुमलाई स्टार तिच्या पती आणि मुलांसह चेन्नईच्या एका आलिशान परिसरात राहते. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, ज्योतिकाचं घर सुमारे 20,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेलं आहे. अभिनेत्रीकडे तामिळनाडूमध्ये इतर काही मालमत्ता देखील आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीकडे मुंबईत 70 कोटी रुपयांचं एक आलिशान अपार्टमेंट देखील आहे.
नेटवर्थच्या बाबतीत अनुष्का शर्मा, कतरिनावरही ज्योतिका करते मात
अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत आणि त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दोघीही लग्झरी लाईफ जगतात. पण, तुम्हाला माहितीय का? दोघीही एकूण संपत्तीच्या बाबतीत, ज्योतिकापेक्षा कित्येक पटींनी मागे आहेत.
अनुष्का, कतरिनाचं नेटवर्थ किती?
कोइमोईच्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 255 कोटी रुपये आहे. अनुष्का सिनेमे, जाहिराती, तिचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड नुश आणि प्रोडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्स या माध्यमातून कमाई करते.
टाईम्स नाऊच्या अहवालानुसार, कतरिना कैफची एकूण संपत्ती 224 कोटी रुपये आहे. चित्रपट आणि ब्रँड जाहिरातींव्यतिरिक्त, कतरिना कैफ तिच्या ब्युटी ब्रँडमधून खूप कमाई करते.
लाईफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफची मुंबईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता देखील आहे. तिच्याकडे वांद्रे येथे 8.20 कोटी रुपयांचा 3BHK अपार्टमेंट, 17 कोटी रुपयांचा लोखंडवाला मालमत्ता आणि लंडनमध्ये एक आलिशान बंगला आहे ज्याची अंदाजे किंमत 7 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :