Bachchan Family Biggest Enemy: बॉलिवूडचे (Bollywood News) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांचं कुटुंब बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबियांपैकी एक. या ना त्या कारणानं बच्चन कुटुंबिय (Bachchan Family) नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या (Divorced) चर्चांना नुकताच वेग आलेला. पण, आतापर्यंत स्टार जोडप्याकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, आज आम्ही तुम्हाला असं बॉलिवूड गॉसिप (Bollywood Gossip) सांगणार आहोत, जे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. बॉलिवूडमध्ये एक सुपरस्टार आहे, ज्याला बच्चन कुटुंबाचा सर्वात मोठा शत्रू म्हटलं जातं. हा सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत फक्त एकाच चित्रपटात दिसला आणि नंतर त्यांच्यात मतभेद झाल्यामुळे त्यांनी कधीही एकत्र काम केले नाही. आता कदाचित तुम्हाला वाटेल की, तो सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) असेल, तर तुम्ही असा विचार अजिबात करू नका... ज्याला बच्चन कुटुंबियांचा सर्वोत मोठा दुश्मन म्हटलं जातं तो, सलमान खान नाही.
'त्या' सुपरस्टारच्या वडिलांसोबत दिलेल्या सर्वात मोठा हिट सिनेमा
मिडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या रायनंही या सुपरस्टारसोबत एक सिनेमा केलेला. पण, तो सिनेमा कधीही प्रदर्शित झालेल नाही आणि त्यानंतर ऐश्वर्यानंही या सुपरस्टारसोबत पुन्हा कधीच काम केलेलं नाही. सलमान खाननं बिग बींसोबत 'बागबान' आणि 'गॉड तुस्सी ग्रेट हो' सारखे चित्रपट केलेत. तर, ऐश्वर्या रायसोबत 'हम दिल दे चुके सनम' सारखे सिनेमे दिले आहेत. पण, आम्ही ज्या स्टारबाबत सांगत आहोत, त्याच्यासोबत ऐश्वर्यानं एक सिनेमा केलेला. पण तोसुद्धा रिलीज झाला नाही.
सलमान खान नाही, मग तो स्टार कोण?
बच्चन कुटुंबियांचा सर्वात मोठा दुश्मन आहे, बॉलिवूडचा 'तारा सिंग' सनी देओल. 30 वर्षांपूर्वी 1994 मध्ये अमिताभ बच्चन आणि सनी देओल 'इन्सानियत' चित्रपटात एकत्र दिसले होते. हा या जोडीचा पहिला आणि शेवटचा चित्रपट आहे. 'इन्सानियत' चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेमुळे बिग बी नाराज होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओलच्या वाढत्या क्रेझमुळे बिग बी टेन्शमध्ये आले आणि बिग बींनी चित्रपटात त्यांची भूमिका वाढवली आणि सनीला बाजूला करण्यात आलं. त्यानंतर दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊ लागले. पण सनी देओल गप्प राहिला, बिग बी आणि त्यांच्या कुटुंबापासून अंतर ठेवू लागला.
ऐश्वर्यापासूनही अंतर राखलं...
त्याच वेळी, या चित्रपटानंतर तीन वर्षांनी सनी देओलनं बिग बींची सून ऐश्वर्या रायसोबत 'इंडियन' (1997) मध्ये काम केलं, परंतु चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर सनी आणि ऐश्वर्या यांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं. चित्रपटाची गाणीही शूट झाली, पण ऐश्वर्यानं सनी देओलसोबत काम करण्यास नकार दिला.
दरम्यान, जेपी दत्ता यांनी 'बॉर्डर'मध्ये सनी देओलला घेतलं. पण, ज्यावेळी त्यांनी फिल्म एलओसी कारगिल बनवली, त्यावेळी सनी देओलऐवजी अभिषेक बच्चनला यामध्ये कास्ट करण्यात आलं. ज्यामुळे सनी आणि जेपी दत्ता यांच्यात बराच काळ अबोला होता. आता जेपी दत्ता यांनी 'बॉर्डर 2'मध्ये सनी देओलला कास्ट केलं आहे.