Richest Pakistani Hindu Actor: पाकिस्तानमध्ये (Pakistan) मुस्लिमांची संख्या मोठी आहेच, पण फाळणीनंतर अनेक हिंदू धर्माच्या लोकांनीही पाकिस्तानात आश्रय घेतला. 52 लाख लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानमध्येही हिंदू धर्माचे लोक राहतात. हे पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 2.17 टक्के आहे आणि या 2.17 टक्के लोकांमध्ये काही कोट्यधीश आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, पाकिस्तानातील हिंदू धर्माच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा ग्लॅमर जगताशी संबंध आहे.
पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सर्वात श्रीमंत हिंदू (Rich Hindu) व्यक्तीचं नाव दीपक पेरवानी (Deepak Perwani) आहे, जे एक लोकप्रिय फॅशन डिझायनर (Popular Fashion Designer) आहेत. एवढंच नाहीतर दीपक स्वतः एक अभिनेते आहेत आणि त्यांनी अनेक पाकिस्तानी नाटकांमध्ये कामही केलं आहे. त्यांचा जन्म 1974 मध्ये मीरपूर खास इथे एका सिंधी कुटुंबात झाला. 1996 मध्ये त्यांनी स्वतःचं कॉउचर हाऊस 'डीपी (दीपक पेरवानी)' उघडलं. जे पाकिस्तानात खूप प्रसिद्ध आहे. लग्नाच्या आणि ट्रेडिशनल वेअर्ससाठी ते ओळखलं जातं.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय नाव
दीपक पेरवानी हा एक पुरस्कार विजेता फॅशन डिझायनर आहे. 2014 मध्ये बल्गेरियन फॅशन अवॉर्ड्समध्ये त्यांना जगातील सहावं सर्वोत्तम फॅशन डिझायनर म्हणून नामांकन मिळालं होतं. आपल्या प्रतिभेच्या जोरावर, पेरवानी यांना खूप प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली. जगातील सर्वात मोठा कुर्ता बनवल्याबद्दल दीपक पेरवानी यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे.
दीपक पेरवानी यांची एकूण संपत्ती किती?
2022 च्या मीडिया रिपोर्टनुसार, दीपक पेरवानी यांची एकूण संपत्ती 71 कोटी रुपये आहे. या नेटवर्थसह, दीपक पेरवानी हे पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू व्यक्ती आहेत. दीपक यांचा चुलत भाऊ नवीन पेरवानीचा देखील पाकिस्तानातील श्रीमंत हिंदूंच्या यादीत समावेश होतो. तो एक प्रसिद्ध स्नूकर खेळाडू आहे आणि त्याची एकूण संपत्ती 60 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.
दीपक पेरवानी यांनी पाकिस्तानी नाटकांमध्ये केलंय काम
दीपिका पेरवानी यांनी अनेक पाकिस्तानी नाटकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो हम टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या अभिनेत्री यमना झैदी स्टारर 'कर्ज-ए-जान' या नाटकात दिसत आहे. याआधी तो 'मेरे पास पास' (2004-2005), 'कदूरट' (2013) आणि 'सौतेली' (2014) सारख्या शोमध्येही दिसला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :