Chhaava Box Office Collection: विक्की कौशल (Vicky Kaushal) - रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'छावा' (Chhaava Movie) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) एका महिन्यापेक्षा जास्त काळ आपली जादू दाखवली. एका महिन्यात 'छावा' (Chhaava) कलेक्शनच्या बाबतीत एकदाही डगमगला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटानं गेल्या महिन्याभरात एक, दोन नव्हे तब्बल 30 विक्रम आपल्या नावे केले. 


जाणून घेऊयात, 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं आतापर्यंत कोणते मोठे रेकॉर्ड रचलेत? 


'छावा'चं बॉक्स ऑफिसवरील विक्रम 


'छावा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 33.10 कोटी रुपये कमावले आणि अनेक विक्रम केलेत. सविस्तर जाणून घेऊयात... 



  • 'छावा' 2025 मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला. याआधी हा विक्रम अक्षय कुमारच्या स्काय फोर्सच्या नावावर होता, ज्यानं पहिल्या दिवशी 15.30 कोटी रुपये कमावले होते.

  • पहिल्या दिवशी इतक्या मोठ्या ओपनिंगसह, हा चित्रपट विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. याआधी, विक्की कौशलचा बॅड न्यूज हा त्याचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट होता, ज्यानं 8.62 कोटी रुपये कमावले होते.

  • पहिल्या दिवशी 33.10 कोटी रुपयांची कमाई करून, 'छावा' विक्की कौशलच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट बनला आहे, ज्यानं सिनेमागृहांमध्ये दुहेरी अंकी कमाई करून चांगली सुरुवात केली आहे.

  • आजपर्यंत 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रदर्शित झालेल्या सर्व बॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रमही 'छावा' च्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम 2019 च्या 'गली बॉय' चित्रपटाच्या नावावर होता. रणवीर सिंहच्या या चित्रपटानं व्हॅलेंटाईन डेला 19.40 कोटी रुपये कमावले.

  • 'छावा'नं पहिल्या दिवशी जगभरात 50 कोटींचा व्यवसाय केला. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित कोणत्याही चित्रपटाचं हे सर्वाधिक ओपनिंग डे वर्ल्डवाइड कलेक्शन आहे.






'छावा'नं ओपनिंग विकेंडला रचले धमाकेदार रेकॉर्ड्स 



  • 'छावा'नं पहिल्या आठवड्याच्या शेवटी 121.43 कोटींची कमाई करून 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करण्याचा विक्रमही रचला आहे.

  • पहिल्या आठवड्याच्या शेवटी इतकी मोठी कमाई करून, 'छावा'नं टायगर जिंदा है, कल्की 2898 एडी, पद्मावत, भूल भुलैया 3 आणि फायटर या पहिल्या आठवड्याच्या कमाईच्या आकडेवारीला खूप मागे टाकलं आहे.

  • 'छावा'नं अवघ्या 6 दिवसांत 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली 2 नंही 6 दिवसांत हा आकडा ओलांडला. हा देखील एक विक्रमच आहे.

  • 2019 मध्ये आलेल्या 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' नंतर, 'छावा' हा विक्कीच्या कारकिर्दीत 200 कोटींचा आकडा आणणारा दुसरा चित्रपट आहे.

  • 'छावा'नं सातव्या दिवशी 21.60 कोटी रुपये कमावले आणि पहिल्या आठवड्यात 225.28 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

  • सातव्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत, चित्रपटानं जवान, दंगल, चेन्नई एक्सप्रेस आणि स्त्री 2 चे सर्वच्या सर्व रेकॉर्ड मोडले.

  • 'छावा'नं आठव्या दिवशी 24.03 कोटी रुपये कमावले आणि एकूण 249.31 कोटी रुपये कमावले, विक्की कौशलच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाच्या 245.36 कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकलं.



'छावा'नं दुसरा विकेंडही गाजवला; भल्याभल्यांना पुरून उरला 



  • 'छावा'नं दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी 109.23 कोटी रुपये कमावले आणि यासोबतच या चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात 100 कोटी रुपये कमावणाऱ्या दुसऱ्या चित्रपटाचा विक्रमही केला. याआधी हा रेकॉर्ड पुष्पा 2 च्या हिंदी भाषेतील चित्रपटाच्या नावावर होता.

  • 'छावा'नं 10 दिवसांत 300 कोटींचा टप्पा ओलांडला आणि विक्की कौशलचा 300 कोटी रुपये कमावणारा पहिला चित्रपट ठरला.

  • 'छावा' हा चित्रपट सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक बनला. पद्मावतने भारतात 302.15 कोटी रुपये कमावले होते. तर 'छावा'नं आतापर्यंत या रकमेच्या जवळपास दुप्पट कमाई केली आहे.

  • 'छावा'नं 15 व्या दिवशी 400 कोटींचा टप्पा ओलांडला आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील 14 वा सर्वात मोठा चित्रपट बनला.

  • 'छवा'नं 23 व्या दिवशी 500 कोटींचा टप्पा ओलांडला आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील काही निवडक चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश झाला. या यादीत आधी फक्त जवान, पठाण, गदर 2, बाहुबली 2, अ‍ॅनिमल आणि पुष्पा 2 यांचा समावेश होता.

  • 'गदर 2', 'पठाण' आणि 'अ‍ॅनिमल' यांना मागे टाकत 'छावा'नं 4 आठवड्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील 8 व्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा किताबही जिंकला.

  • 27 व्या दिवशी 'छावा'नं सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं.

  • 14 मार्च रोजी होळीच्या दिवशी 'छावा'नं 6.6 कोटींची कमाई केली आणि 29 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या दिवशी, पुष्पा 2 ला फक्त 3.75 कोटी रुपये कमाई करता आली.

  • होळीच्या दिवशी छावानं आणखी एक विक्रम रचला. या दिवशी, चित्रपटानं 560 कोटी रुपयांचा आकडा गाठला आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांपैकी एक बनला. आता, फक्त जवान (640.25 कोटी रुपये) आणि स्त्री 2 (597.99 कोटी रुपये) छावापेक्षा पुढे आहेत.

  • तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, 'छावा'नं चौथ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळवलं आहे. या चित्रपटानं 43.98 कोटी रुपये कमावले, ज्यानं स्त्री 2 च्या 37.75 कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकले, तर पुष्पा 2 या बाबतीत पुढे होता आणि त्याने 57.95 कोटी रुपये कमावले.

  • 'छावा'नं वीकेंड 5 मध्ये 22 कोटी रुपये कमाई करून एक विक्रमही रचला. तरण आदर्शच्या मते, पुष्पा 2 नं पाचव्या आठवड्याच्या शेवटी 14 कोटी रुपये आणि स्त्री 2 नं 16 कोटी रुपये कमावले.

  • तेलुगू आवृत्तीमध्ये 'छावा'नं टॉप 5 कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळवलं आहे. 'छावा'नं कमाईत शाहरुखच्या पठान (13 कोटी) ला मागे टाकलं आहे.

  • 'छावा'नं जगभरातील कमाईतही इतिहास रचला आहे. 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून हा चित्रपट जगभरातील 10 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.



अॅक्टर्ससाठी वरदान'छावा'


'छावा' चित्रपटाचा फायदा केवळ विक्की कौशललाच झाला नाही, तर चित्रपटाशी संबंधित इतर कलाकारांसाठीही हा चित्रपट वरदान ठरला आहे.



  • अ‍ॅनिमल आणि पुष्पा 2 नंतर, रश्मिका मंदानानं काम केलेला हा सलग तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.

  • हा चित्रपट विनीत कुमार सिंहचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.

  • हा अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट आहे, ज्यानं 580 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

  • तसेच, हा चित्रपट विक्की कौशलचा उरी नंतरचा दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.

  • हा चित्रपट आशुतोष राणा आणि डायना पेंटी यांचा आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा पहिला चित्रपट आहे, ज्यानं इतकी कमाई केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Janhvi Kapoor Boyfriend Shikhar Pahariya: तू तर XXX, जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंडवर जातीयवादी कमेंट; शिखर पहाडियाचं रोखठोक उत्तर