SSR Death Anniversary  : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज स्मृतिदिन आहे. त्याच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुशांतसोतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुशांत आणि तिचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. 


रियाची पोस्ट
रियानं सुशांतसोबतचे काही खास फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, ' दररोज तुझ्या आठवणी दाटून येतात...' रियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. पोस्टला कमेंट करुन अनेकांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.






छोट्या पडद्यावरील ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेमध्ये सुशांतनं प्रीत जुनेजा ही भूमिका साकारली. या मालिकेनंतर सुशांतला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली. केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.


हेही वाचा: