Sushant Singh : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज (14 जून) दुसरा स्मृतिदिन आहे. 21 जानेवारी 1986 रोजी सुशांतचा जन्म झाला. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सुशांतच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. जाणून घेऊयात सुशांत सिंह राजपूतच्या जीवनप्रवासाबद्दल...


शिक्षण सोडून अभिनय क्षेत्रात पदार्पण


पाच बहिण भावांमध्ये सुशांत सिंह राजपूत  हा सर्वात छोटा होता. सुशांतचे टोपण नाव हे  ‘गुलशन’असं होतं. सुशांत बालपणी आभ्यासात फार हुशार होता. सुशांतनं भौतिकशास्त्र या विषयात राष्ट्रीय ऑलिम्पियाड जिंकले होते. सुशांत सिंग राजपूतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल  इंजिनिअरिंग कोर्सला प्रवेश घेतला होता. पण सुशांतची आवड इंजिनिअरिंगमध्ये कमी आणि अभिनयात जास्त होती.कॉलेजमध्ये शिकत असताना सुशांत हा  शामक डावर यांच्या डान्स क्लासमध्ये जात होता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी सुशांतनं कॉलेज सोडून कला क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. 


हिट चित्रपटांमध्ये केलं काम


कॉलेज सोडल्यानंतर सुशांतनं एका थिएटर ग्रुपमध्ये सहभाग घेतला. छोट्या पडद्यावरील  ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेमध्ये सुशांतनं प्रीत जुनेजा ही भूमिका साकारली. या मालिकेनंतर सुशांतला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली.  केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे  यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. 


पीके चित्रपटासाठी केवळ 21 रुपये मानधन घेतलं
रिपोर्टनुसार, पीके चित्रपटामध्ये 15 मिनीटांचा रोल करण्यासाठी सुशांतनं 21 रुपये मानधन घेतलं होतं. त्यावेळी तो एका चित्रपटाचे जवळपास 5 कोटी मानधन घेत होता. पण  दिग्दर्शक  राजकुमार हिरानी यांच्याकडून सुशांतनं 21 रुपये मानधन म्हणून घेतले. 


हेही वाचा :