Remo D’Souza : ग्लॅमरस क्षेत्रात नेपोटिझम आणि रेसिजम हे मोठ्या प्रमाणात होते. अनेक कलाकारांनी या विषयांवर चर्चा केली आहे. प्रसिद्ध नृत्य कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझाने (Remo D’Souza) त्याला आलेला अनुभव शेअर केला आहे.  


रेमोची पोस्ट


रेमो डिसूझा सांगितलं की, ' बालपणीपासून माझ्या त्वचेच्या रंगामुळे लोकांनी ट्रोल केले. कालू कालिया सारख्या नावाने लोक मला बोलत होते.' रेमोने नुकताच 'हम काले है तो क्या हुआ दिल वाले है' या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला रेमोनं कॅप्शन दिलं, 'मला खूप राग येत होता जेव्हा लोक मला कालिया, कालू म्हणत होते, पण माझ्या आईनं मला सांगितलं होतं की रंगानं काही फरक पडत नाही, माणसाचे मनं चांगले असले पाहिजे. ती 'हम काले है तो क्या हुआ दिल वाले है' हे गाणं गात होती. त्यामुळे मला हे गाणं आवडतं. ' तसेच रेमो पत्नी  लिजेल (Lizelle D'souza)सोबतचे फोटो देखील शेअर करत असतो. 





2020 मध्ये रेडमोला ह्रदयविकाराचा झटका आला होता. रेमोनं डीआयडी लिटील मास्टर या कार्यक्रमाचे परिक्षण करत आहे. तसेच या कार्यक्रमाचे परिक्षण अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि मौनी रॉय हे देखील करतात. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha