Indian Idol 12 बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी हे अमुक एका कारणानं चर्चेत येण्याची काही पहिलीच वेळ नाही. यावेळी चर्चेत आल्या आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा. रेखा यांना ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा चिरतरुण हाच शब्द त्यांच्यासाठी पूरक ठरतो. आपल्या सौंदर्यानं अनेकांनाच घायाळ करणाऱ्या रेखा या इंडियन आयडॉल 12 या कार्यक्रमात पाहुण्या म्हणून उपस्थिती लावणार आहेत. यावेळी त्यांच्या चित्रपटातील एकाहून एक सरस गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. 


रेखा यांची उपस्थिती असणारे काही व्हिडीओ याच निमित्तानं सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये रेखा स्पर्धकांच्या साथीनं स्पर्धेत एकरुप होताना दिसत आहेत, तर कुठे भावूक होतानाही दिसत आहेत. अशातच त्यांचा एक व्हिडीओ मात्र चांगलाच चर्चेत आला आहे. 


IPL 2021Viral Video |  राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू रुमचा कॅमेरा बंद करायला विसरला अन्...  


हल्लीच रेखा यांचा सहभाग असणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोहम्मद दानिश नावाच्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून रेखा यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे आहेत. दानिशनं 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटातील गीतावर परफ़ॉर्मन्स दिला. ज्या गाण्याचं चित्रीकरण अमिताभ बच्चन यांच्यावर करण्यात आलं होतं. आता बिग ही आणि रेखा यांच्या नात्याबाबतच्या चर्चांविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तेव्हा हे गाणं सादर होत असताना रेखा यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.



इतक्यावरच न थांबता रेखा यांनी या स्पर्धकाला दोन-दोन हजारांच्या नोटा बक्षीस स्वरुपात दिल्या.  रेखा आणि अमिताभ बच्चन, यांच्या नावाचा उल्लेख झाला आणि अनेकांच्या नजरा वळल्या नाहीत, असं होणं क्वचितच. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा एकेकाळी गाजलेली ही सेलिब्रिटी जोडी चाहत्यांचं लक्ष वेधण्यास कारणीभूत ठरली आहे.