मुंबई : पुष्पा-2 या चित्रपटामुळे रश्मिका मंदान्ना ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे. तिची क्रेझ चांगलीच वाढली आहे. मुळची दाक्षिणात्त्य अभिनेत्री असली तरी बॉलिवुडमध्येही तिने मोठं नाव कमवलं आहे. लवकरच तिचा सलमान खानसोबत सिकंदर हा चित्रपट येणार आहे. दरम्यान, हीच रश्मिका मंदान्ना तिच्या अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या नात्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेली आहे. दोघेही एकमेकाना डेट करता आहेत, असं म्हटलं जातंय. दरम्यान, आता न्यू ईअरचं सेलीब्रेशन करण्यासाठी हे दोघे एकत्र पदेशवारीसाठी निघाल्याचं म्हटलं जातंय. कारण दोघेही विमातळावर स्टॉपट झाले आहेत.
दोघेही विमानतळावर एकत्र दिसले
मिलालेल्या माहितीनुसार रश्मिका मंदाना नुकतेच एका विमातनाळावर दिसली आहे. याच विमानतळावर विजय देवरकोंडादेखील दिसला आहे. याच कारणामुळे हे दोन्ही सेलिब्रिटी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र आले असून ते एकत्रच न्यू इअरचे सेलीब्रेशन करणार आहेत, असा दावा केला जातोय. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना हे एकमेकांच्या रिलेशनशीपमध्ये आहेत, असं सांगितलं जातं. ते दोघेही अनेकवेळा एकत्र दिसेलेले आहेत. त्यामुळेच हे दोघे नेहमीच चर्चेत असतात.
विजय देवरकोंडाने रिलेशनशीमध्ये असल्याचं केलं मान्य
याआधी दोन वर्षांपूर्वी रश्मिका आणि विजय देवरकोंडा विमानतळावर अशाच प्रकारे एकत्र दिले होते. त्यानंतर या दोघांचीही मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत असल्याचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळीदेखील हे दोघे एकत्र फिरायला जात असल्याचा दावा केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा ते परदेशात निघून गेल्याचं म्हटलं जातंय. दोघेही एकत्र सुट्ट्या घालवणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी ते एअरपोर्टवर मात्र एकत्र दिसले नाहीत. ते दोघेही वेगवेगळ्या वेळेला विमानतळावर पोहोचले आहेत.
दरम्यान, विजय देवरकोंडाने तो रिलेशनशीपमध्ये असल्याचं मान्य केलं आहे. मात्र त्याने रश्मिकां मंदान्नाचे नाव घेतलेले नाही. तर रश्मिकाने आतापर्यंत तरी तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलेलं नाही.
हेही वाचा :
निळ्याशार समुद्रात अवतरली सुंदरी, 23 वर्षांच्या अवनीतच्या ब्लू ड्रेसमधील फोटोंची चर्चा!