Patal Lok Release Date Out : प्राईम व्हिडीओची पाताल लोक या सुप्रसिद्ध वेब सिरिजच्या दुसऱ्या सिझनचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या वेब सिरिजचा दुसरा सिझन कधी येणार? येणार असे विचारले जात होते. शेवटी वेब सिरिज पाहण्याची आवड असणाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. 


पाताल लोकचा दुसरा सिझन 'या' तारखेला येणार


पाताल लोक या सिरिजचा पहिला सिझन सर्वांनाच आवडला होता. या सिझनमधील दृश्ये, उत्कंठावर्धक कथा पाहून अनेकजण मंत्रमुग्ध झाले होते. या वेब सिरिजचं दिग्दर्शन  अरुण धवरे यांनी केलं होतं. या पहिल्या सिझननंतर आता लगेच दुसऱ्या सिझनचाही मुहूर्त ठरला आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंह आमि गुल पनाग यासारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. यासोबतच तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर जुन्हू बरुआ यासारख्या कलाकारांचीही या दुसऱ्या सिझनमध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. पाताल लोकचा दुसरा सिझन भारतासहित एकूण 240 पेक्षा जास्त देशांत प्रदर्शत होणार आहे. तुम्हाला ही वेब सिरीज अॅमेझॉन प्राईमवर 17 जानेवारी 2025 पासून पाहता येईल. 


पातल लोकच्या दुसऱ्या सिझनमध्ये नेमकं काय असणार? 


पाताल लोकचा पहिले सिझन लोकांच्या चांगलेच पसंतीस पडले होते. या सिरिजमधील क्लायमॅक्स पाहून तर अनेकजण थक्क झाले होते. न्याय, भ्रष्टाचार आदींवर समस्यांवर विचार करायला लावणारी ही सिरिज आहे.  या वेब सिरिजमध्ये हातीराम चौधरी नावाचे मुख्य पात्र आहे. या पात्रपुढे दुसऱ्या सिझनमध्ये नवी आव्हानं असणार आहेत. हे पात्र ती नव्ही आव्हानं पेलू शकणार का? नेमका काय थरार रंगणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 


पाताल लोकच्या पहिल्या सिझनमध्ये कोण-कोण होतं?


दरम्यान पाताल लोकच्या दुसऱ्या सिझनमध्ये आणखी थरार असेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पाताल लोकच्या पहिल्या सिझनची चित्रपट समीक्षकांनी चांगलीच स्तुती केली होती. पाताल लोकच्या पहिल्या सिझनमध्ये जयदीप अहलावत, छून दारंग, आनंदिता बोस, निहारिका दत्त, अभिषेक बॅनर्जी, स्वास्तिका मुखर्जी,  इश्वाक सिंह, अक्षय शर्मा आदी लकाकार होते.


हेही वाचा :


जेव्हा जॉकी श्रॉफने अनिल कपूरच्या तब्बल 17 वेळा कानशिलात लगावली होती, जाणून घ्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं होतं?


त्याला कपड्यांवरून हिणवलं, हमसून-हमसून रडला, 'या' करोडपती हिरोच्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायी प्रसंग, नेमकं काय घडलं होतं?


महात्मा गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचे वादग्रस्त विधान!