Ranveer Singh : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह ( Ranveer Singh ) हे नेहमीच चर्चेत असतात. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. रणवीरनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं दीपिका नाही तर या गोष्टीला ' जिंदगी' म्हटलं आहे.
अमेरिकेमध्ये शुक्रवारी (18 फेब्रुवारी) रात्री नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या 'ऑल-स्टार सेलेब्रिटी गेम' (NBA All Star Celebrity Game)मध्ये रणवीरनं सहभाग घेतला. दरवर्षी एनबीए चे आयोजन केले जाते. रणवीर सिंहने यावर्षी क्लीवलँड, अमेरिकेमध्ये कॉमेडियन टिफनी हॅडिश, मशीन गन केली, जॅक हार्लो यांसारख्या आर्टिस्टसोबत खेळ खेळला. या खेळातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रणवीर काही कलाकारांसोबत बास्केटबॉल कोर्टमध्ये जाताना दिसत आहे. रणवीर सिंह जेव्हा कोर्टमध्ये एन्ट्री करतो तेव्हा अनाउंसर म्हणतो, 'क्राउडमधून येणार आवाज हा रणवीरच्या चाहत्यांचा आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 38.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. '
रणवीरनं बास्केटबॉल खेळतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला. रणवीरला फुटबॉल आणि बास्केटबॉल हे खेळ खेळायला आवडतात. त्यानं एनबीए या गेमचे काही फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'बॉल इज लाइफ'.
संबंधित बातम्या
- Dadasaheb Falke International Film Festival Awards : 'शेरशाह' बेस्ट फिल्म तर रणवीर बेस्ट अॅक्टर; पाहा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची यादी
- Sai Pallavi : 'कोट्यवधींचं मानधन असणारी जाहिरात नाकारली' ; चेहऱ्यावरील पिंपल्सबाबत साई पल्लवीनं सांगितला अनुभव
- Hrithik Roshan ह्रतिकच्या फॅमिली फोटोमधील नव्या पाहुण्याची चर्चा ; व्हायरल फोटोमुळे रंगल्या चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha