Panchmukhi Hanuman: प्रभू श्रीराम भक्त हनुमान (Panchmukhi Hanuman) साक्षात जागृत देव आहे. हनुमानाची भक्ती करणं जेवढी सोपी आहे तेवढीच अवघड देखील आहे. कधी कधी आयुष्यात एवढं मोठं संकट येतं ज्यातून बाहेर पडणं फार कठीण वाटतं. अशा स्थितीत हनुमानजींची पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी. हनुमानजी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. यामुळेच त्याला संकट मोचन म्हणतात. हनुमानाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.


जर तुमच्या जीवनातील समस्या संपत नसतील तर तुम्ही तुमच्या घरात हनुमानचा फोटो  लावा. ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये भगवान हनुमानाचे पंचमुखी चित्र लावल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीची समस्या दूर होते. केवळ बजरंगबलीचे स्मरण केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया हनुमानजींचा पंचमुखी अवतार कोणता आहे आणि त्याचा फोटो कोणत्या दिशेला लावावा?


हनुमानाचे पाच चेहरे कोणते?


घरामध्ये भगवान हनुमानाचे पंचमुखी चित्र लावल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. पंचमुखी हनुमानाच्या पाच मुखांचे वेगळे महत्त्व आहे. यामध्ये देवाची सर्व मुखे वेगवेगळ्या दिशांना आहेत. पूर्वेकडे भगवान हनुमानाचा पहिला चेहरा वानराचा जो शत्रूंवर विजय मिळवून देतो. पश्चिम दिशेला देवाचे गरुडचा आहे जो जीवनातील अडथळे आणि संकटे दूर करते. दक्षिण दिशेला नरसिंहाचा जो मनातील भिती दूर करतो तर उत्तर दिशेला असणारा चेहरा वराहचा आहे. तर आकाशाकडे पाहणाऱ्या हनुमानाचा चेहरा घोड्याचा आहे. जो सर्व मनोकामना पूर्ण करतो.


पंचमुखी हनुमानाचा फोटो कोणत्या दिशेला लावावा?


पंचमुखी हनुमानाचा फोटो लावताना तो योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे. पचमुखी हनुमानाचा फोटो घराच्या प्रवेशद्वारावर लावणे शुभ मानले जाते. घराच्या प्रवेशद्वारावर लावल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात येत नाही. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेला नकारात्मत ऊर्जा निर्माण होते. या दिशेला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्यास घरात सुख समृद्धी येते. घरात नैऋत्य 
दिशेला लावल्यास वास्तूदोष नष्ट होतात. 


हनुमानाने पंचमुखी अवतार का घेतला?


कथेनुसार, जेव्हा राम आणि रावण यांच्यात युद्ध चालू होते, तेव्हा आपले सैन्य हरत असल्याचे पाहून रावणाने आपल्या मायावी भाऊ अहिरावणकडे मदत मागितली. अहिरावण माता भवानीचा महान भक्त आणि तंत्रविद्येत उत्तम तज्ञ होता. आपल्या मायावी शक्तीच्या जोरावर त्याने प्रभू रामाच्या संपूर्ण सैन्याला झोपवले आणि राम-लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले. अहिरावण हे भवानी मातेचे परम भक्त असल्याने. त्यांनी माता भवानीच्या नावाने पाच दिशांना पाच दिवे लावले होते. त्याला वरदान होते की जो कोणी हे पाच दिवे एकत्र विझवू शकेल तो त्याच्याकडून त्याच मृत्यू होणार होता. त्यामुळे प्रभू श्रीरामाला वाचवण्यासठी आणि अहिरवाणाचा पराभव करण्यासाठी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केले.  हनुमानाने पाच मुखे धारण करून पाचही दिशांचे दिवे विझवले, अहिरावानाचा वध केला आणि राम-लक्ष्मणाला त्याच्या तावडीतून मुक्त केले.


हे ही वाचा :


Shani Dev : शनिच्या त्रासातून वाचायचं असेल तर हे दहा उपाय नक्की करा, ‘या’ उपायांनी होणार बचाव