Ranbir Kapoor, Alia Bhatt : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गूड-न्यूज चाहत्यांना दिली होती. अलियानं ही गूड-न्यूज दिल्यानंतर अनेकांनी आलियाच्या करिअरवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. पण नुकत्याचं एका मुलाखतीमध्ये रणबीरनं आलियाच्या करिअरबाबत सांगितलं. 


रणबीर म्हणाला, 'आलिया ही खूप चांगली पार्टनर आहे. ती खूप मेहनती आहे. तिनं खूप कमी वयात खूप चांगलं काम केलं आहे. लोक म्हणत आहेत की करिअर करत असताना मुलाला जन्म दिल्यानं आलियाच्या करिअरवर परिणाम होईल पण हे मुल आम्हाला देवानं दिलेलं गिफ्ट आहे. त्यासाठी आम्ही देवाचे आभार मानतो. '


पुढे रणबीर म्हणाला, 'मला वाटतं आई झाल्यानंतर आलिया करिअरला देखील चांगल्या प्रकारे सांभाळेल आणि ती चांगलं काम करेल. आम्ही बरेच प्लॅन केले आहेत ' स्वत:च्या वडिलांबाबत रणबीर म्हणाला, 'माझे वडील हे खूप चांगले होते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकडे आणि करिअरकडे विशेष लक्ष दिले. माझ्या वडिलांसारखं मी माझ्या मुलांना सांभाळेल. माझ्या वडिलांचे आणि माझाचे अनुभव मी माझ्या मुलांना सांगेन.'


आलिया आणि रणबीरनं 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरनं लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर आलिया आणि रणबीरची पहिली भेट झाली. लवकरच आलिया आणि रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. आलियानं एक फोटो शेअर करुन चाहत्यांना गूड न्यूज दिली. आलियानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं. आलियाचा लवकरच डार्लिंग्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


हेही वाचा: