Kailash Kher : प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांच्या आज 49 वा वाढदिवस आहे. 7 जुलै 1973 मध्ये उत्तर प्रदेश येथे कैलाश यांचा जन्म झाला. कैलाश हे सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहेत. कैलाश यांना बालपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती पण या गोष्टीला त्यांचे कुटुंब विरोध करत होते. संगीतक्षेत्रात काम करण्यासाठी कैलाश यांनी 14 व्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी लहान मुलांना संगीत शिकवण्यास सुरुवात केली. जाणून घेऊयात कैलाश यांच्याबद्दल...


कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्याचे प्रयत्न


1999 हे वर्ष कैलास यांच्यासाठी कठिण होते. या वर्षी कैलाश यांनी त्यांच्या मित्रासोबत हँडीक्राफ्टचा व्यवसाय सुरु केला. कैलास आणि त्यांच्या मित्राला या व्यवसायामध्ये खूप नुकसान झाले. नुकसान झाल्यामुळे कैलाश यांनी  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यानंतर कैलाश हे 2001 मध्ये मुंबईला आले. 


मुंबईमध्ये आल्यानंतर कैलाश यांनी गायन करण्यासाठी अनेक ऑफर्स आल्या. कैलाश यांच्या आयुष्यात अनेक संकटं आली पण त्यांनी संगीत सोडले नाही. जेव्हा कैलाश हे संगीत दिग्दर्शक राम संपत यांना भेटले तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. एका अॅडमध्ये जिंगल्सचे गायन करुन कैलाश यांनी करिअरला सुरुवात केली. 


अक्षय कुमार आणि प्रियंका चोपडा यांच्या अंदाज या चित्रपटातील  'रब्बा इश्क ना होवे' या कैलाश यांच्या गाण्यानं अनेकांची मनं जिंकली. त्यानंतर अनेक हिट चित्रपटांमधील गाणी कैलाश यांनी गायली. कैलाशा यांनी हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, उडिया आणि उर्दू या भाषांमधील एकूण 700 पेक्षा जास्त गाणी कैलाश यांनी गायली आहेत. कैलाश यांना फिल्मफेअरच्या बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे. 


हेही वाचा:


Corona vaccination | देशात 100 कोटी कोरोना लसीचा टप्पा ओलांडल्याचं जंगी सेलीब्रेशन होणार! कैलाश खेर यांचं गाणं लाँच