Urmila Matondkar Ram Gopal Varma Married Claim Jyoti Venkatesh: बॉलिवूडमधले (Bollywood News) अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मग ते प्रसिद्ध अभिनेता (Actor) आणि अभिनेत्रीचं (Actress) असो किंवा क्रिकेटर्स आणि अभिनेत्री याचं असो वा दिग्दर्शक आणि एखाद्या अभिनेत्रीचं असो... बॉलिवूडच्या दशकभरापूर्वीच्या अफेअर्सच्या चर्चाही आज तेवढ्याच मसालेदार पद्धतीनं खपवल्या जातात. अशातच आता अशाच एका जुन्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. या चर्चा आहे, नव्वदच्या दशकातले गाजलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Director Ram Gopal Varma) आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Actress Urmila Matondkar) यांच्या. राम गोपाल वर्मा किंवा उर्मिला यांच्यापैकी कोणीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही जाहीरपणे भाष्य केलेलं नाही. पण, आता एका पत्रकारानं केलेल्या दाव्यानं यांच्या अफेअरच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असून अख्ख्या इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. 

Continues below advertisement

ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना दावा केलाय की, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं केवळ अफेअर नव्हतं, तर दोघांचं लग्नही झालेलं. त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी नेमकं काय म्हणाल्या? सविस्तर जाणून घेऊयात...

खरंच, उर्मिला मातोंडकर आणि राम गोपाल वर्मा यांचं लग्न झालेलं? (Urmila Matondkar Ram Gopal Varma Married?)

Continues below advertisement

सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना ज्योती व्यंकटेश यांनी सांगितलं की, त्या राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्याबद्दल लिहायच्या, पण त्यांच्याबद्दलच्या बातम्या न छापण्यासाठी त्यांना दोन्ही बाजूंनी दबाव टाकला जायचा. त्यांनी चिरंजीवी यांच्यासोबतच्या एका भेटीचा किस्सा सांगितला. त्यावेळी चिरंजीवी 'जेंटलमन' (Gentleman) सिनेमावर काम करत होते. चिरंजीवी यांनी त्यांना विचारलं की, "तुम्ही इतकं लिखाण करता, मग राम गोपाल वर्मा यांनी उर्मिलाशी लग्न केलंय, असं तुम्ही का लिहिलं नाही?" 

ज्योती व्यंकटेश यांनी विचारलं की, "हे लग्न कधी झालं? कारण त्यांना केवळ त्यांच्यातील अफेअरची माहिती होती. चिरंजीवी यांनी ठामपणे सांगितलं की, दोघांचंही लग्न झालेलं आणि त्यांनी आंध्र प्रदेशातील एका मंदिरात आपली लग्नगाठ बांधलेली. ज्योती व्यंकटेश यांना यावर शंका होती, त्यांनी म्हटलं की, कोणीही असा दावा करू शकतं, पण चिरंजीवी यांनी लग्न झाल्याचं ठासून सांगितलं आणि ज्या व्यक्तीनं मंदिरात हा विवाह लावून दिला होता, तिचा फोन नंबरही दिला. त्यानंतर व्यंकटेश यांनी एका मासिकात लिहिलं की, त्या दोघांचं लग्न झालं होतं. ही बातमी छापण्यापूर्वी त्यांनी उर्मिलाला फोन केला, त्यावेळी उर्मिला ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली की, "तुम्ही मला किती काळापासून ओळखता? तुम्ही माझ्याबद्दल असं कसं लिहू शकता?"

त्यानंतर ज्योती व्यंकटेश यांनी राम गोपाल वर्मा यांना फोन केला, पण त्यांनी यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. व्यंकटेश त्यांना म्हणाल्या की, "तुमची पत्नी रडतेय आणि तुमचं एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध आहेत, याचा तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो..." त्यावर वर्मा यांनी केवळ एवढंच उत्तर दिलं की, त्यांना या विषयावर चर्चाच करायची नाही.

राम गोपाल वर्मा, उर्मिला मातोंडकर यांचं नातं का तुटलं? (Ram Gopal Varma And Urmila Matondkar Relationship End?)

उर्मिला मातोंडकरनं लग्नाला नकार दिला होता का, असं विचारल्यावर ज्योती व्यंकटेश यांनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, उर्मिला केवळ रडत होती, पण तिनं लग्नाला नकार दिला नव्हता. त्यांच्या नात्यात दुरावा कसा आला? याबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, उर्मिलाला राम गोपाल वर्मा यांच्याशी कायदेशीररीत्या लग्न करायचं होतं, पण त्यांनी तसं केलं नाही, परिणामी ते वेगळे झाले. उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या लग्नाचं सत्य चिरंजीवी यांनी का उघड केलं? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, चिरंजीवी आणि राम गोपाल वर्मा यांचे संबंध चांगले होते आणि कदाचित त्यांच्यात काहीतरी घडलं असावं, ज्यामुळे चिरंजीवी यांनी ती संधी साधून ही बातमी जाहीर केली. ती बातमी चिरंजीवी यांनीच बाहेर आणली होती, याची कल्पना आजही उर्मिला किंवा राम गोपाल वर्मा यांना नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actor Struggle Life: वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, पहिल्याच फिल्मनं छाटले करिअरचे पंख, 'सुपरस्टार' बनण्यापूर्वीच बनला इंडस्ट्रीचा सर्वात मोठा 'फ्लॉपस्टार'