Devendra Fadnavis Would be Prime minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस (Balasaheb Fadnavis) यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या पुण्यातील प्रकाशन सोहळ्यात  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काकांनी हा  विश्वास व्यक्त केला. माझा पुतण्या लॉ मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे  त्याच्याकडे उत्कृष्ट वक्तृत्व होतेच, त्यामुळे तो राजकारणात येईल असं मला वाटलं होतं. नागपूरमधील एका प्रसिद्ध वकिलांकडे तो काम करत होता आणि त्यानंतर तो जनसंघात गेला. माझा पुतण्या कधी घरात राजकारण करत नाही . तेव्हा तो मोकळा असतो. माझा हा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल असं मला वाटतं असं वक्तव्य बाळासाहेब फडणवीस यांनी आज पुण्यात केलं. बाळासाहेब फडणवीस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. (Maharashtra Politics news)

Continues below advertisement

त्याने एखादी गोष्ट मनावर घेतली की तो पूर्ण करत असे, कुठेही थांबत नसे. एकदा ठरलं तर ठरलं. त्याचा अभ्यास तो म्हणजे खरोखर अलौकिक आहे. तो लॉ कॉलेजमध्ये असताना तो आणि त्याचा मित्र दोघेही वादविवादपटू होते. नागपूरमध्ये महाविद्यालयांमध्ये वादविवाद स्पर्धा व्हायच्या, त्यामध्ये हे दोघे असले की समजायचं, पारितोषिक यांनाच मिळणार. वयाच्या 21 व्या वर्षी हा नगरसेवक झाला, 27 व्या वर्षी महापौर झाला आणि 31 व्या वर्षी आमदारकीची उडी मारली. आमदारकीची निवडून जिंकताना तुम्ही बघाल तर त्याने ज्यांचा दबदबा होत अशा राजकारण्यांचा पराभव केला. त्यावेळी काँग्रेसची मोठी ताकद होती. अशा स्थितीत तो लढला, मोठमोठ्या दिग्गजांचे त्याने पराभव केले. तीन निवडणुकांमध्ये त्याने मोठ्या मताधिक्यासह विजय मिळवला, असे बाळासाहेब फडणवीस यांनी सांगितले. 

आम्हालाही कधी वाटलं नव्हतं तो मुख्यमंत्री होईल. पण त्याच्या जन्माच्या वेळेला त्याची पत्रिका झाली, त्या पत्रिकेत माझ्या वडिलांनी बघितलं आणि सांगितलं की, हा घराण्याचं नाव उज्ज्वल करेल. पण एक गोष्ट आहे की, त्याच्या पत्रिकेत चंद्रबळ कमी आहे. मग त्यादृष्टीने जे उपाय करावे लागतात, ते करण्यात आले. आम्हाला खरोखर त्यावेळी वाटले नव्हते की तो मुख्यमंत्री होईल. कारण लॉ कॉलेजमध्ये तो पहिला आला, गोल्ड मेडलिस्ट होता. अतिश्य उत्तम वक्तृत्व असल्यामुळे वकिलीच्या क्षेत्रात चमकेल, निष्णात कायदेतज्ज्ञ होईल, असे वाटले होते. पण जीवनात कलाटणी कशी मिळते. तो काही दिवस नागपूरमधील नामांकित विधिज्ञ अणे यांच्याकडे कामाला होता. हा आपली कारकीर्द पुढे नेईल, असे त्यांना वाटत होते. पण जनसंघाने त्याला भाजपमध्ये पाठवले, तो तीनवेळा निवडून आला. खरोखर इतक्या लहान वयात राजकारणात अशी कामगिरी करणारा दुसरा कोणी झाला असेल, असे मला वाटत नाही. असा हा माझा पुतण्या, घरी असला की त्याच्या खोड्या चालू असतात. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही, कुटुंबाच्या गोष्टी करतो. त्यावेळी तो अतिश्य मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असे मला वाटत असल्याचे बाळासाहेब फडणवीस यांनी म्हटले. 

Continues below advertisement

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील