Bollywood Actor Prithvi Vazir Struggle Life: 'लाइट्स, कॅमेरा आणि ॲक्शन', हे इंडस्ट्रीतलं (Entertainment Industry) जग जरी बाहेरुन चमचमतं वाटत असलं, तरी पडद्यामागचं वास्तव सांगणारी परिस्थिती अत्यंत वेगळी आणि कठोर असू शकते. इंडस्ट्रीतलं हे ग्लॅमर कित्येकांचं करिअर घडवतं, तर कित्येकांना संपवतं. अनेक उदाहरणं आपण पाहिलीत की, ज्यांनी करिअर घडवण्याच्या नादात नैराश्याचा सामना केलाय. इतकंच काय तर, अनेकांनी याच नैराश्यात स्वतःला संपवण्यापर्यंत टोकाचं पाऊल उचललं. एकदा संधी मिळाली तर झालं, असं नसतं. इथे एकदा मिळालेलं स्टारडम टीकेलच असं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देखण्या अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो आपल्या पहिल्याच सिनेमातून स्टार बनला खरा, पण नंतर नियतीनं असा काही खेळ खेळला की, तो सुपरस्टारऐवजी फ्लॉपस्टार (Bollywood Actor) म्हणून ओळखला जाऊ लागला. 

Continues below advertisement

1990 च्या दशकात, 'बॉई नेक्स्ट डोअर' आकर्षक लूकसाठी ओळखल्या जाणाऱ्या या होतकरू अभिनेत्याकडून अनेकांना मोठ्या अपेक्षा होत्या. ज्या निर्मात्यानं त्याला सिनेसृष्टीत आणलं, त्यांनाही तो हिंदी सिनेसृष्टीवर राज्य करेल असा विश्वास वाटत होता. पण, एका करारानं त्याचं करिअर उद्ध्वस्त केलं. विशेष म्हणजे, 'दिवाना' आणि 'डर' यांसारख्या सिनेमांमधून ज्यांनी शाहरुख खानला यशाच्या शिखरावर पोहोचवलं, ते सुरुवातीला याच अभिनेत्याला देऊ केले गेले होते. आम्ही ज्या देखण्या अभिनेत्याबाबत बोलतोय, तो अभिनेता म्हणजे, दिव्या भारतीचा हिरो अभिनेता पृथ्वी. यांनी 'दिल का क्या कसूर' या सिनेमातून दिव्या भारतीसोबत पदार्पण केलं होतं.

Continues below advertisement

आजच्या पिढीला अभिनेते पृथ्वी यांच्याबद्दल फारशी माहिती नसेल, पण त्यांच्या पहिल्या सिनेमातील सुपरहिट गाणी आजही हजारो वर्षांमध्ये सर्वाधिक आवडती आहेत. मग ते 'दिल का क्या कसूर'चं टायटल ट्रॅक असो, किंवा 'दिल जिगर नजर क्या है', 'गा रहा हूँ इस मेहफिल में', आणि 'मिलने की तुम कोशीश करना' सारखी गाणी असोत. 

वयाच्या 24 व्या वर्षी पदार्पण (Actor Prithvi Life Story)

1992 मध्ये जेव्हा पृथ्वी यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं, तेव्हा ते 24 वर्षांचे होते. आज ते 58 वर्षांचे असून सिनेसृष्टीपासून दूर आहेत. सोशल मीडियावर काही प्रमाणात सक्रिय आहेत. 24 मार्च 1968 रोजी दिल्लीत जन्मलेल्या पृथ्वी यांचं खरं नाव अली वझीर आहे, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर ते 'पृथ्वी वझीर' या नावानं सर्वांना भेटतील. 

एक कॉन्ट्रॅक्ट अन् हिरावली गेली अख्खी कारकीर्द (Prithvi Vazir Bollywood Career)

1992 मध्ये जेव्हा पृथ्वीचा 'दिल का क्या कसूर' सिनेमा प्रदर्शित झाला, ज्यात दिव्या भारती त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. तेव्हा या म्युझिकल रोमँटिक ड्रामानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड खळबळ उडवून दिली. मुकेश दुग्गल यांची निर्मिती आणि लॉरेन्स डिसूझा यांचं दिग्दर्शन असलेल्या सिनेमात मुख्य जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. पृथ्वी रातोरात स्टार बनले आणि त्यांना बड्या सिनेनिर्मात्यांकडून ऑफर्स मिळू लागल्या. दुर्दैवानं, ते मुकेश दुग्गल यांच्यासोबतच्या एका कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकले होते. या कॉन्ट्रॅक्टमुळे त्यांच्या यशाच्या मार्गात केवळ अडथळेच आले नाहीत, तर त्यांची कारकीर्द अक्षरशः संपुष्टात आली. या करारात एक अशी अट होती, जी त्यांना अनेक वर्षे इतर कोणत्याही बॅनरच्या सिनेमांमध्ये काम करण्यापासून रोखत होती.

वडिलांच्या मित्रानं बनवलं हिरो, अन्... 

'दिल का क्या कसूर' सिनेमाचे निर्माते मुकेश दुग्गल यांच्या मनात पृथ्वीबद्दल कोणताही राग किंवा द्वेष नव्हता. उलट, त्यांना अभिनेते पृथ्वी यांच्यात एक भावी सुपरस्टार दिसत होता आणि पृथ्वी यांनी आपल्या बॅनरखालीच सुरुवातीचे सर्व सिनेमे करावेत अशी त्यांची इच्छा होती. किंबहुना, मुकेश दुग्गल आणि पृथ्वी यांचे वडील मित्र होते. दुग्गल यांनीच अली वझीर यांना सिनेसृष्टीत आणलं आणि त्यांना 'पृथ्वी' हे नाव दिलं. आपल्या या मुख्य अभिनेत्याच्या देखण्या रूपानं ते खूप प्रभावित झालेले, त्यांना खात्री होती की, जर या तरुणानं अभिनयकलेवर प्रभुत्व मिळवलं, तर तो नक्कीच एक मोठा स्टार बनू शकेल.

सुपरहिट पदार्पणानंतर सलग अपयश

त्यानंतर पृथ्वी यांनी सिनेमांत काम करणं थांबवलं असं नाही. सुपरहिट पदार्पणानंतर तो 'दिलवाले कभी ना हारे', तसेच 'मेरी आन' आणि 'पांडव' यांसारख्या सिनेमांत झळकला, पण हे सिनेमे अपयशी ठरले. त्यानंतर त्यानं 'दरार', 'आज का अंधा कानून', 'खंजर', 'इक्के पे इक्का' आणि 'प्लॅटफॉर्म' यांसारख्या सिनेमांत सहाय्यक भूमिकाही साकारल्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दूरदर्शनच्या 'रामायण'चा 'हा' अभिनेता, 13व्या वर्षीच थाटलेला संसार, सातवीत सुटली शाळा, अन् वयाची साठी ओलांडल्यानंतर झाले सुपरस्टार