FIR Against Ram Gopal Varma : सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा  (Ram Gopal Verma) हा नेहमी चर्चेत असतो. ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारा   राम गोपाल वर्मा हा वेगवेगळ्या विषयांवरील ट्वीट शेअर करत असतो. पण हेच ट्वीट करणं आता राम गोपाल वर्माला भोवलं आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी राम गोपाल वर्माच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हजरतगंज कोतवाली येथे आयटी कायद्यासह विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


राम गोपाल वर्माचं ट्वीट
राम गोपाल वर्मानं ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे मग कौरव कोण आहेत?' या ट्वीटमुळे राम गोपाल वर्माला अनेकांनी ट्रोल केलं. त्यानंतर राम गोपाल वर्मानं या ट्वीटबाबत स्पष्टीकरण देखील दिलं होतं. पण आता त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 






राम गोपाल वर्मानं दिलं होतं स्पष्टीकरण
एक ट्वीट शेअर करुन राम गोपाल वर्मानं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं होतं, 'मी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ नव्हता. द्रौपदीची भूमिका ही महाभारतातील माझी आवडती भूमिका आहे, त्यामुळे समान नावांमुळे मला संबंधित पात्रांची आठवण झाली. या विधानातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता.'


हेही वाचा: