Mahesh Babu, Ram Gopal Varma : गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू (Mahesh Babu) हा त्यानं केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. यावेळी महेश बाबूनं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबत सांगितलं होतं. 'बॉलिवूडला मी परवडत नाही', असं तो म्हणाला होता. आता त्याच्या या वक्तव्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) प्रतिक्रिया दिली आहे. 


हिंदीमध्ये डब केलेला चित्रपट रिलीज करुन पैसे कमावतात
राम गोपाल वर्मानं  बॉलिवूडबाबत महेश बाबूनं केलेल्या वक्तव्याला प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला, 'हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पण मला तो जे म्हणालाय ते कळालच नाही. तो म्हणाला की, बॉलिवूड त्याला अफोर्ड करु शकणार नाही पण, यामधून तो नक्की काय म्हणू इच्छितो. मला कळालच नाही. जर तुम्ही साऊथचे चित्रपट पाहिले तर ते हिंदीमध्ये डब केले जातात. आणि त्यामधून हे लोक पैसे कमावतात.'


पुढे राम गोपाल वर्मा म्हणाला, 'बॉलिवूड ही कोणतीही कंपनी नाही. हे नाव मीडियाद्वारे देण्यात आलं आहे. एखादे विशिष्ट चित्रपट किंवा प्रॉडक्शन हाऊस तुम्हाला एका फीमध्ये चित्रपट ऑफर करते, परंतु यासाठी तुम्ही संपूर्ण बॉलिवूडचे नाव कसे घेऊ शकता? त्यामुळे महेश बाबूचं नक्की काय मत आहे हे मला  कळालेलं नाही. '


मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये महेश बाबूनं बॉलिवूडबाबत वक्तव्य केलं होतं. 'मला बॉलिवूडमधून खूप ऑफर्स आल्या. बॉलिवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. तेलगू चित्रपटांमुळेच मला स्टारडम आणि लोकांचं प्रेम मिळालं. ' पुढे महेश बाबू म्हणाला होता, 'माझा उद्देश  पॅन इंडिया स्टार व्हायचा नाहीये. मला दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरात यश मिळवून द्यायचंय. मला आधी पासूनच तेलगू चित्रपटांमध्ये काम करायचे होते आणि माझी इच्छा होती की भारतातील सर्व लोकांनी हे चित्रपट बघावेत. 


1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.


हेही वाचा :