मुंबई : 'बिग बॉस'च्या नुकत्याच संपलेल्या सीझन 14 ची अंतिम स्पर्धक अभिनेत्री राखी सावंतने 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या चाहत्यांना तिची आई हॉस्पिटलमध्ये कॅन्सवर उपचार घेत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी राखीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माझ्या आईसाठी प्रार्थना करा असे म्हटले होते. आता राखीने व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे आभार मानले आहेत.
राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखीची आई सलमानचे आभार मानताना दिसत आहे. राखी आणि तिची आई म्हणाली की, धन्यवाद सलमान बेटा. सोहेलजी तुमचे पण धन्यवाद. मी रुग्णालयात असून आतापर्यंत माझे चार किमो झाले अजून दोन किमो बाकी आहे. त्यानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राखीने या व्हिडीओती हात जोडून सलमानचे आभार मानले आहे.
राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिची आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. या व्हिडीओत सलमानला रॉकस्टार म्हटले आहे. दोन दिवसापूर्वीच मदत मागितली होती.
राखी सावंत म्हणाली, की "माझ्या आईला पोटाचा कँन्सर आहे आणि तिच्या उपचारासाठी मी सलमान खानच्या 'बीइंग ह्युमन फाउंडेशन'कडून मदत मागितली आहे." राखी म्हणाली की, सलमान एक चांगला मनाचा माणूस आहे. त्याच्या फाऊंडेशनकडून नक्कीच आईच्या उपचारासाठी मदत मिळेल. एका वर्षापूर्वी माझ्या आईच्या पोटाचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी तिच्या पोटातून कँन्सरची गाठ काढल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरही तिला कँन्सर कसा झाला हे मला समजेना. 'बिग बॉस 14' मध्ये जाण्याअगोदर, म्हणजे तीन महिन्यांपूर्वी माझ्या आईचे ऑपरेशन झाले होते."
संबंधित बातम्या :