मुंबई : 'बिग बॉस'च्या नुकत्याच संपलेल्या सीझन 14 ची अंतिम स्पर्धक अभिनेत्री राखीने 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या चाहत्यांना एक वाईट बातमी सांगितली आहे.
राखीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे सांगितले की तिची आई जया सावंत कर्करोग सारख्या प्राणघातक आजाराने ग्रस्त आहेत आणि या क्षणी आईसाठी सर्वांच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून राखीने रुग्णालयातील आईचे दोन फोटो शेअर केले आहेत.
यासंदर्भात एबीपी न्यूजने राखी सावंतशी संपर्क साधला असता ती म्हणाली, की "माझ्या आईला पोटाचा कँन्सर आहे आणि तिच्या उपचारासाठी मी सलमान खानच्या 'बीइंग ह्युमन फाउंडेशन'कडून मदत मागितली आहे." राखी म्हणाली की, सलमान एक चांगला मनाचा माणूस आहे. त्याच्या फाऊंडेशनकडून नक्कीच आईच्या उपचारासाठी मदत मिळेल.
राखीने एबीपी न्यूजला सांगितले की, "बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर मला आई रुग्णालयात असून कॅन्सरने ग्रस्त असल्याची माहिती मिळाली. जेव्हा मी रुग्णालयात आईला पाहिले तेव्हा मला धक्का बसला.
राखी म्हणाली, "एका वर्षापूर्वी माझ्या आईच्या पोटाचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी तिच्या पोटातून कँन्सरची गाठ काढल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरही तिला कँन्सर कसा झाला हे मला समजेना. मी 'बिग बॉस 14' मध्ये जाण्याअगोदर, म्हणजे तीन महिन्यांपूर्वी माझ्या आईचे ऑपरेशन झाले होते."
राखी सावंत म्हणाली की तिची आर्थिक परिस्थिती खराब असून तिचा बहुतेक पैसा तिच्या आईच्या उपचारासाठी खर्च झाला आहे. अशा परिस्थितीत ती आर्थिक संकटाशी झगडत आहे. राखी म्हणाली, "याच कारणास्तव मी सलमान खानच्या 'बिइंग ह्युमन फाउंडेशन' आणि संजय दत्त आणि त्याची बहीण प्रिया दत्त यांच्या कर्करोगाचा उपचार करणार्या 'नर्गिस दत्त फाउंडेशन' कडून मदत मागितली आहे." माझं प्रिया दत्तशी बोलणं झालं असून त्यांनी आईची फाईल मागितली आहे."
राखी सावंत यांचे बंधू राकेश सावंत यांनी एबीपी न्यूजला सांगितले, "पोटाच्या कर्करोगाने त्रस्त असलेली त्याची आई गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईच्या जुहू परिसरातील 'क्रिटी केअर हॉस्पिटल' मध्ये दाखल आहे." राकेश पुढे म्हणाला, "डॉक्टरांच्या मते, आईला तिसऱ्या टप्प्याचा कर्करोग आहे. सध्या तिच्यावर रेडिएशन आणि केमोथेरपी चालू आहे. तिला एकूण 6 वेळा केमोथेरपी द्यावी लागणार असून आतापर्यंत दोनदा केमोथेरपी झाली आहे."
'बिग बॉस 1' आणि 'बिग बॉस 14' मध्ये भाग घेतलेल्या राखीने एबीपी न्यूजला सांगितले की, तिच्या आईची मनापासून इच्छा आहे की यावेळी तिने 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकावी. राखी म्हणाली, "या वेळी ट्रॉफी न जिंकल्यामुळे माझी आई थोडी निराश झाली आहे. आता माझी आई म्हणते की मी 'बिग बॉस'च्या पुढील सत्रात पती रितेशबरोबर भाग घ्यावा आणि 'बिग बॉस' ट्रॉफी जिंकून आणावी." राखी हसून म्हणाली, "आता ही माझ्या आईची शेवटची इच्छा आहे." विशेष म्हणजे राखी सावंतची 70 वर्षीय आजारी आई देखील 'बिग बॉस'च्या तिसर्या सीझनचा एक भाग राहिली आहे.