Rakhi Sawant Wedding : मनोरंजन विश्वातील ड्रामा क्वीन (Drama Queen) राखी सावंत (Rakhi Sawant) अनेक कारणांनी चर्चेत असते. कधी राखी लग्न, कधी नवरा, कधी बिग बॉस तर कधी बॉयफ्रेंड अशा अनेक कारणांनी चर्चेत असते. सध्या राखी चर्चेत आहे ती तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे. जेव्हापासून राखीने तिचा प्रियकर आदिल दुर्रानीबाबत (Adil Durrani) जगाला सांगितलं आहे, तेव्हापासून ती अनेकदा आदिलबरोबर दिसते. या दोघांची जोडी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. दरम्यान, राखीने पुन्हा एकदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. या दोघांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट हातात धरलेलं दिसतंय. राखीचा असा फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. 

राखी आणि आदिलचे नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. सार्वजनिक ठिकाणी दोघेही एकमेकांवर मोकळेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण राखीने तिच्या नात्याला एक नवे नाव दिल्याचं या फोटोंमधून दिसतंय. राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी कोणालाही न सांगता सेलिब्रिटी, मीडिया, मित्र-मंडळींपासून लपवून लग्न केलं आहे असं या फोटोंमधून दिसतंय. या कपलने कोर्ट मॅरेज केले असून कोर्ट मॅरेजनंतर दोघांचा पहिलाच फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये दोघांच्या गळ्यात माळ दिसत आहे.




राखी आणि आदिलचं लग्न (Rakhi Sawant and Adil Wedding) :


आदिल आणि राखीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये राखीने पांढरा आणि गुलाबी रंगाचा शरारा घातला आहे. तर, दुसरीकडे आदिल दुर्रानी ब्लॅक शर्ट आणि ब्लू जिन्समध्ये दिसतो. दोघेही अगदी साध्या लूकमध्ये या फोटोत दिसतायत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दोघांनीही त्यांच्या कोर्ट मॅरेजचे सर्टिफिकेट हातात ठेवले आहे. त्याचवेळी, दुसऱ्या फोटोत दोघेही त्यांच्या लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना दिसत आहेत. हा फोटो समोर येताच चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. आदिल खान दुर्रानी राखी सावंतपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे आणि तो एक बिझनेसमन आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Exclusive Akshay Kelkar On Rakhi Sawant : "राखी सावंत 'बिग बॉस'ची बायको"; एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय केळकर म्हणाला...