Raju Srivastav : राजू श्रीवास्तव ( Raju Srivastav Death) यांचे वयाच्या 59 व्या वर्षी काल दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली


दिल्लीच्या दशरथपुरीतून निघणार अंत्ययात्रा 
राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10 वाजता दिल्लीतील निगम बोध येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. तर सकाळी 8 वाजता दशरथपुरी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. माहितीनुसार, राजू श्रीवास्तव 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रियाही पार पडली होती. त्यानंतर ते शुद्धीवर आले नाही. रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी राजू श्रीवास्तव यांना मृत घोषित करण्यात आले.


 






पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
राजू श्रीवास्तव यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन श्रृष्टीत शोककळा पसरली आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'राजू श्रीवास्तव यांनी आमचे जीवन हास्य, विनोद आणि सकारात्मकतेने भरले. ते लवकरच आपल्यातून निघून गेले, पण आपल्या समृद्ध कार्यातून ते असंख्य लोकांच्या हृदयात राहतील.


 




 


संबंधित बातम्या


Raju Srivastav Death :  कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Raju Srivastav Death :  'तारा निखळला'; राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडून शोक व्यक्त