Raju Srivastav Death :  कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. 


मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं काम (Indian Comedian Raju Srivastav)


1989 मध्ये रिलीज झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटात त्यांनी काम केलं.  राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत होते. 2005 ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही  राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.






मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच  'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह होते. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव या गेल्या काही दिवसांपासून राजू यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती देत होत्या. तसेच राजू यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू यांच्या तब्येतीबाबत माहिती देत होते. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.  राजू श्रीवास्तव यांना अनेक सेलिब्रीटी श्रद्धांजली वाहत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Raju Srivastava Health Update : ‘आता एखाद्या चमत्काराचीच अपेक्षा’, सुनील पाल यांनी दिली राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची माहिती