Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर (Jamnagar) न्यायालयाने संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊंस प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi)  यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या शिक्षाची सुनावताना चेकच्या दुप्पट रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. घायल आणि घातक सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने चेक बाऊंस प्रकरणात शनिवारी (दि.17) शिक्षा सुनावली. संतोषी यांनी जामनगर येथील व्यावसायिक अशोकलाल यांच्याकडून 1 कोटी रुपये घेतले होते. मात्र ते परतच केले नाहीत. यानंतर अशोकलाल राजकुमार संतोषी यांच्याविरोधात न्यायालयात गेले होते. याच प्रकरणात आता न्यायालयाने मोठा निकाल दिलाय. 


 10 लाखांचे 10 चेक दिले


हे प्रकरण 2015 चे आहे. 2019 मध्ये राजकुमार संतोषी याप्रकरणात न्यायालयात हजर झाले होते. अशोकलाल यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, राजकुमार संतोषी आणि अशोकलाल हे चांगले मित्र आहेत. 2015 मध्ये संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून 1 कोटी रुपये उधार घेतले होते. ही रक्कम परत करताना राजकुमार संतोषी यांनी अशोकलाल 10 लाखांचे 10 चेक दिले. जे 2016 मध्ये बाऊंस झाले होते. 


अशोकलाल यांची जामनगर न्यायालयात धाव 


दरम्यानच्या काळात अशोकलाल यांनी संतोषी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर अशोकलाल यांनी जामनगर न्यायालयात धाव घेतली. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर 17 वेळा सुनावणी झाली. यावेळी राजकुमार संतोषी न्यायालयात हजर झाले नाही. 18 व्या सुनावणीवेळी राजकुमार संतोषी न्यायालयात हजर झाले. बाऊंस झालेल्या प्रत्येक चेकसाठी संतोषी यांना 15 हजार द्यावे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, आता न्यायालयाने कठोर निर्णय घेतलाय. प्रत्येक चेकच्या दुप्पट रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


राजकुमार संतोषी यांची सिनेक्षेत्रातील कारकिर्द 


67 वर्षीय राजकुमार संतोषी प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी सनी देओलसह शाहिद कपूर, रणबीर कपूर, कटरिना कैफ, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार अशा दिग्गज कलाकारांसोबत काम केलय. त्यांनी 'खाकी', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'दामिनी' अशा अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.याशिवाय 'पुकार', 'लज्जा',  'दिल है तुम्हारा' आणि 'अंदाज या सिनेमांचे त्यांनी लेखन केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Suhani Bhatnagar Passed Away: दंगलमधील 'छोटी बबीता' सुहानी भटनागरचे निधन, अवघ्या 19 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप