GOLD ETF : आजकाल गुंतवणूकदारांचा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे मोठा कल असल्याचं दिसून येतंय. जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत असताना सर्वसामान्य गुंतवणूकदारांनीही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिल्याचं दिसून येतंय. अशा परिस्थितीत Zerodha Fund House ने आपली नवीन योजना Gold ETF लाँच केली आहे. Zerodha Gold ETF योजना 16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणूकदारांसाठी अर्ज करण्यासाठी खुली असेल आणि ते 1 मार्च 2024 रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध केले जाईल.


सोने आणि मनी मार्केटमध्ये गुंतवणूक


Zerodha Fund House ने दिलेल्या माहितीनुसार, Zerodha Gold ETF योजना ही एक ओपन-एंडेड योजना आणि कमी किमतीची ETF आहे. Zerodha Gold ETF मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करू शकतात. झिरोधा गोल्ड ईटीएफ योजनेचा मुख्य उद्देश देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीच्या कामगिरीवर आधारित परतावा निर्माण करणे हा आहे. Zerodha Gold ETF 95 ते 100 टक्के रक्कम भौतिक सोने आणि इतर सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवेल, तर योजनेच्या रकमेच्या 0 ते 5 टक्के रक्कम कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवली जाईल.


Zerodha Fund House चे CEO विशाल जैन यांनी Zerodha Gold ETF लाँच करताना सांगितले की, सोन्याला आर्थिक मालमत्तेचा दर्जा आहे जो महागाईच्या काळात त्याचे मूल्य आणि क्रयशक्ती टिकवून ठेवतो. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे आहे आणि गुंतवणूकदारांना भौतिकदृष्ट्या सोने ठेवण्याच्या जोखमीपासून मुक्त करते. ते म्हणाले की, सोन्याचा इक्विटीशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये फारच कमी चढ-उतार दिसून येतात.


Zerodha Gold ETF च्या NFO मध्ये, गुंतवणूकदार किमान 500 रुपये आणि त्याहून अधिक गुंतवणूक करू शकतो आणि तो 100 रुपयांच्या पटीत पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकतो. स्टॉक एक्स्चेंजवर Zerodha Gold ETF ची सूची झाल्यानंतर, गोल्ड ETF थेट एक्सचेंजमधून खरेदी करता येईल. Zerodha Gold ETF चे प्रारंभिक NAV (Net Asset value) रुपये 10 प्रति युनिट असेल.


अलीकडेच, AMFI ने आपल्या डेटामध्ये म्हटले आहे की जानेवारी 2024 मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये एकूण 657 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, जी डिसेंबर 2023 च्या तुलनेत 7 पट जास्त आहे. एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, जानेवारीच्या अखेरीस गोल्ड फंडाच्या व्यवस्थापनाखालील एयूएम 27,778 कोटींवर पोहोचला आहे.


ही बातमी वाचा: