Yashasvi Jaiswal : टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करत असलेल्या यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा नजारा सादर करताना इंग्लंडविरुद्धच्या राजकोटमधील तिसऱ्या कसोटीततील दुसऱ्या डावात दमदार शतकाची नोंद केली. यशस्वीने केलेल्या शतकी खेळीमुळे टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहोचली आहे. त्यामुळे टीम इंडियाची आघाडी आता 300 च्या घरात गेली आहे.






यशस्वी जैस्वालने पहिल्यांदा संयम फलंदाजी केल्यानंतर अर्धशतक झळकावले. त्यानंतरचा शतकी पल्ला त्याने आक्रमक फटकेबाजी करत पूर्ण केले. त्याने चौकार मारून आपले तिसरी कसोटी शतक पूर्ण केले. इतकेच नव्हे तर तो वेगाने तीन शतके झळकवणारा सातवा फलंदाज ठरला. हा पराक्रम भारताकडून संजय मांजरेकर आणि वीरेंद्र सेवाग यांच्या नावावर होता तो त्याने आज मोडीत काढला. 



  • Sehwag: 13 inngs | Avg 53.31 | SR 66.63

  • Yashasvi: 13 inngs | Avg 62.25 | SR 65.87

  • Yashasvi is the joint seventh fastest to three Test 100s alongside Sehwag and Sanjay Manjrekar.


भारताकडून आता हा पराक्रम आता जैस्वालच्या नावे नोंदवला गेला. गिलने सुद्धा त्याला संयमी साथ देताना शानदार फलंदाजी केली. त्यानेही दुसऱ्या बाजूने अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्याचा दबाव आला नाही. 






दुसरीकडे दुसऱ्या दिवशी भक्कम सुरुवात सुरुवात घेऊन उतरलेल्या इंग्लंडची फलंदाजी तिसऱ्या दिवशी पूर्णत: कोलमडली. त्यामुळे इंग्लंडचा डाव 319 धावांवरती गुंडाळला गेला. भारताकडून सिराजने धारदार गोलंदाजी करताना चार विकेट पटकावल्या. त्याला कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने उत्कृष्ट साथ देताना दोन दोन गडी बादे केले, तर बुमराह आणि अश्विनला एक विकेट मिळाली. 






इंग्लंडकडून डकैतने 153 धावांची खेळी केली हीच त्यांच्या डावातील सर्वोत्तम खेळी ठरली. व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. मधल्या फळीत कर्णधार बेन स्टोक्सने 41 धावांची खेळी केली, तर ओली पोप 39 धावा करून बाद झाला. अन्य फलंदाज फक्त खेळपट्टीवर आले आणि परतले अशीच काहीशी स्थिती इंग्लंडच्या फलंदाजीची झाली. 


इतर महत्वाच्या बातम्या