Rajkummar Rao And Patralekhaa Marriage: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) हे विवाहबंधनात अडणार आहे. 10, 11 आणि 12 नोव्हेंबरला या दोघांचा लग्नसोहळा पार पडणार असल्यांच कळतंय. चंदीगड इथं पारंपारिक पद्धतीनं त्यांचा विवाह होणार आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा सर्वात प्रथम एका जाहिरातीदरम्यान भेटले होते. त्यानंतर त्या दोघांना सिटी लाईट्स या चित्रपटात त्यांना कास्ट करण्यात आले. दोघांनी बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या राजकुमार रावकडे बी टाऊनमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सिटीलाईट या चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.
एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, राजकुमार राव आणि पत्रलेखाचा विवाह सोहळा 13 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राजकुमार आणि पत्रलेखा हे पारंपारिक रितीरिवाजाने विवाह करणार आहेत. त्या दोघांनी लग्नासाठी चंदीगड हे ठिकाण निवडले आहे. दोघांचे लग्नाचे आउटफिट हे सेलिब्रिटी डिझायनर सब्यसाची हे डिझाइन करणार आहेत. या लग्नात दोघांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र सहभागी होतील.
सिटीलाईट या चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. राजकुमार आणि पत्रलेखा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कृती सेनन चा 'हम दो हमारे दो' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे.
संबंधित बातम्या :