Rajesh Khanna : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अशी ओळख असणारे अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna)यांचा आज स्मृतीदिन. राजेश खन्ना हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत होते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा होता. राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना असे आहे. त्यांनी 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आखिरी खत' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. राजेश खन्ना यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांच्यासोबत काम केलं. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. लग्नानंतर मुमताज अमेरिकेला गेल्या. त्यानंतर त्यांच्या आठवणीने राजेश खन्ना भावूक झाले होते. राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्यासोबत लग्न केल्यावर मुमताज यांची पहिली प्रतिक्रिया कशी होती हे जाणून घेऊयात....
मुमताज यांनी दिली अशी रिअॅक्शन
डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी राजेश खन्ना अंजू महेंद्रू यांच्यासोबत 10 वर्षे ते सिरीयस रिलीलेशनशिपमध्ये होते. मुमताज यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्हाला सर्वांना वाटत होते की राजेश खन्ना हे त्यांची गर्लफ्रेंड अंजू महेंद्रूसोबत लग्न करतील, दोघेही सिरीयस रिलीलेशनशिपमध्ये होते. मात्र, राजेश खन्ना यांनी डिंपलसोबत लग्न केल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही सर्वांनाच धक्का बसला.'
अंजू महेंद्रू आणि राजेश खन्ना यांचे नाते
राजेश खन्ना यांना अंजू महेंद्रू यांच्यासोबत लग्न करायचे होते. अंजू यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करणे बंद करावे आणि घरी आरामात राहावे अशी राजेश खन्ना यांची इच्छा होती. पण अंजू या त्यांच्या करिअरबाबत खूपच सिरीयस होत्या. तेव्हा अंजू आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटर गॅरी सोबर्स यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, अंजू यांना चिडवण्यासाठी राजेश खन्ना यांना त्यांच्या घरासमोरून वरात देखील काढली होती.
हेही वाचा: