Rajesh Khanna Dimple Kapadia Marriage : बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) त्यांच्या सिनेमांशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. राजेश खन्ना डिंपल कपाडियासोबत (Dimple Kapadia) लग्नबंधनात अडकले आहेत. राजेश खन्नासोबत लग्न करण्याआधी डिंपलचे नाव ऋषी कपूरसोबत (Rishi Kapoor) जोडले जात होते. ऋषी कपूर आणि डिंपलची जोडी 'बॉबी' सिनेमात दिसली होती. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघांची मैत्री झाली होती. दरम्यान ऋषीने डिंपलला अंगठीची भेट दिली होती. ऋषीला डिंपलसोबत लग्न करायचे होते. 


ऋषी कपूर आणि डिंपलच्या लग्नाला राज कपूर यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी डिंपलसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला असे त्यांच्या चाहत्यांना वाटले. पण आजही ऋषीने दिलेली अंगठी डिंपलकडे आहे. हे सर्व राजेश खन्नाला माहित असल्याने त्याने लग्नाआधीच ऋषीने डिंपलला दिलेली अंगठी समुद्रात फेकून दिली. 


राजेश खन्ना आणि डिंपल यांची पहिली भेट कुठे झाली? 


राजेश खन्ना एका कार्यक्रमासाठी गुजरातला गेले होते. जिथे डिंपल कपाडियांसोबत त्यांची पहिली भेट झाली. या कार्यक्रमात राजेश खन्ना प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे अफेअर तीन वर्षे चालले आणि त्यानंतर 1973 मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. त्यावेळी डिंपल फक्त 16 वर्षांच्या होत्या आणि राजेश खन्ना त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. पण, हे वयातील अंतर त्यांच्यातील प्रेम कमी करू शकले नाही.


डिंपलचे सिनेमे


'अर्जुन', 'एतबार', 'काश', 'राम लखन', 'बीस साल बाद', 'बंटबारा', 'प्रहार', 'अजूबा', 'नरसिम्हा', 'गर्दिश', 'क्रांतिवीर', 'दिल चाहता है', 'बीईंग सायरस', 'दबंग', 'कॉकटेल','पटियाला हाउस', 'फायडिंग फॅनी', अशा हिट सिनेमांत डिंपल कपाडिया झळकल्या आहेत. बॉबी या सिनेमाने डिंपलला लोकप्रियता मिळाली होती.


संबंधित बातम्या


Jaya Prada On Rajesh Khanna : राजेश खन्ना सेटवर नेहमी उशीरा यायचे; 'द कपिल शर्मा'शोमध्ये जया प्रदा म्हणाल्या...


Jhimma : 'झिम्मा'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता 27 तारखेला टीव्हीवर दिसणार