Google Doodle Today Oskar Sala : आज 18 जुलै रोजी गुगलने प्रसिद्ध जर्मन संगीतकार ऑस्कर साला (Oskar Sala) यांच्या 112व्या जयंती निमित्त गुगलने डूडल बनवत श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्कर साला (Oskar Sala) एक अभिनव संगीतकार होण्यासोबतच भौतिकशास्त्रज्ञही होते. ऑस्कर साला यांनी अनेक मालिका, रेडिओ यांशिवाय चित्रपटांना संगीत दिलं आहे. ते मिक्स्चर-ट्रुटोनियम (Mixture-Trutonium Instrument) नावाच्या वाद्यावर त्यांचं प्रभुत्व होतं.
ऑस्कर साला यांचा जीवनप्रवास
Oskar Sala यांचा जन्म 1910 साली जर्मनीमध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांची आई गायिका आणि वडील नेत्र रोग तज्ज्ञ होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून संगीत बनवण्यास सुरुवात केली. ट्रुटोनियम नावाच्या वाद्याबद्दल ऐकल्यानंतर ते अतिशय प्रभावित झाले. त्यांना या वाद्यातील तंत्रज्ञान आवडलं. ऑस्कर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ट्रुटोनियम शिकण्यात आणि त्याला अधिक विकसित करण्यात घालवलं.
ऑस्कर साला यांनी मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्याची निर्मिती केली
ऑस्कर साला यांनी शिक्षण घेतानाच मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्याची (Mixture-Trutonium Instrument) निर्मिती केली. हे वाद्य बनवताना त्यांना त्यांच्या संगीतकार आणि इलेक्ट्रो इंजिनिअरच्या शिक्षणाचा खूप उपयोग झाला. त्यांनी बनवलेलं संगीत सर्वांपेक्षा वेगळं होतं. त्यांची शैली वेगळी होती. त्यांनी बनवलेलं मिक्स्चर-ट्रुटोनियम वाद्य इतके समृद्ध होते की ते एकाच वेळी अनेक प्रकारचे आवाज काढू शकत होतं.
ऑस्कर साला यांनी अनेक उत्तम संगीत तयार केले. टीव्ही, रेडिओ आणि चित्रपटांसाठी तयार केलेलं त्यांचं संगीत खूप लोकप्रिय झालं. ऑस्कर साला यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांची आई अॅनेमेरी एक प्रसिद्ध गायिका होती. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या संगीताला प्रोत्साहन दिलं आणि त्यांना पाठिंबा दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- GST Rates Hike : महागाईचा भडका, आजपासून अन्नपदार्थांसह 'या' वस्तू महागणार
- भारतात फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन तरुणीनं रचली अपहरणाची खोटी कहाणी, पोलिसांनी 24 तासांत सोडवलं प्रकरण, नक्की काय घडलं?
- Petrol Diesel Prices : आज तुमच्या शहरांत एक लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार? झटपट चेक करा लेटेस्ट दर