Anand : प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आनंद (Anand) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता लवकरच या चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती केली जाणार आहे. एन सी सिप्पी यांचा नातू म्हणजेच समीर राज सिप्पी आणि विक्रम खाखर हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
तरण आदर्श यांनी या रिमेकबाबत एक पोस्ट शेअर केली. विक्रम खाखर यांनी आनंद या चित्रपटाच्या रिमेकबाबत सांगितलं, 'आपल्या क्लासिक चित्रपटांच्या यादीमध्ये आनंद या चित्रपटाचं नावं एखाद्या अनमोल रत्नासारखं आम्हाला दिसलं. कोरोनानंतर आनंद चित्रपटचा रिमेक केल्यानंतर आपल्या आयुष्यातील आनंद वाढेल. '
निर्माते समीर राज सिप्पी यांनी सांगितलं की, 'आनंद चित्रपटाची कथा ही नव्या पिढीला कळाली पाहिजे. आनंद चित्रपटच्या या रिमेकमधून आम्ही या नव्या पिढीसमोर एक चांगलं कथानक सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.' आनंद चित्रपटच्या रिमेकची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांनी अजूनही या चित्रपटाच्या स्टार कास्टची माहिती दिली नाही. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना आता पडला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा आनंद हा चित्रपट 12 मार्च 1971 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं. आनंद चित्रपटानं 0.98 कोटींची कमाई केली.
आनंद चित्रपटामधील काही गाजलेले डायलॉग
1."बाबूमोशाय , ज़िंदगी और मौत ऊपरवाले के हाथ है…उसे न आप बदल सकते हैं न मैं!"
2.बाबू मोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहांपनाह, उसे ना आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कहां उठेगा ये कोई नहीं बता सकता.
3.मैं मरने से पहले नहीं मरना चाहता… ये तो मैं ही जानता हूं कि ज़िंदगी के आख़िरी पड़ाव पर कितना अंधेरा है.
हेही वाचा :
- Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’
- Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान
- Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेला 75 हजाराचा सायबर फटका; आंबोली पोलिसांनी केला गुन्हा दाखल