Arjun Kapoor,Malaika Arora : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हे गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळते. सध्या त्या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता नुकतीच अर्जुननं एक पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनच्या या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधलं. 

बुधवारी अर्जुननं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. यामध्ये त्यानं लिहिलं होतं, 'मला या गोष्टींचं नवलं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त लोकांना माझ्या आयुष्याबद्दल माहित आहे. ' अर्जुनच्या या पोस्टमुळे असं लक्षात येतं की, त्याच्या लग्नाची अफवा लोक पसरवत आहेत, असं त्याचं मतं आहे.

एका रिपोर्टनुसार अर्जुन आणि मलायका नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्या दरम्यान लग्नगाठ बांधणार आहेत. पण याबाबत मलायका आणि अर्जुननं अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. 

 मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मलायका ही नेहमी ट्रोलर्सला उत्तर देत असते.

अर्जुनची पोस्ट :

 

मलायकाचा झाला होता घटस्फोटमलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.  त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे. 

हेही वाचा :